Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Saam Tv

डोळ्यांखालची डार्क सर्कल्स

डार्क सर्कल्स आपला लूक नेहमीच खराब करतात. काहींना झोप, तणाव असल्याने डार्क सर्कल्स येतात तर काहींना हार्मोनल बदलांमुळे ही समस्या उद्भवते.

DARK CIRCLE REMEDIES

डार्क सर्कल्सवर उपाय

डार्क सर्कल्सवर उपाय करताना आपण साधारण काकडी किंवा बटाटाचा वापर करतो, पण खरच यापैकी कोण जास्त फायद्याचा असतो माहित आहे का?

DARK CIRCLE REMEDIES

बटाट्याचे फायदे

बटाट्यामध्ये एन्झाइम्स, व्हिटॅमिन सी आणि स्टार्च यांसारखे नैसर्गिक ब्लीचींग गुणधर्म असतात. त्यामुळे बटाट्याचा रस चोळल्याने काळे डाग कमी होण्यास मदत मिळते. त्वचा उजळते.

DARK CIRCLE REMEDIES

काकडीचाही पर्याय

काकडीमध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात ,त्यामुळे रखरखलेल्या,कोरड्या पडलेल्या त्वचेला थंडावा मिळतो. काकडीमुळे डोळ्यांखालची सूज आणि थकवा क्षणात गायब होतो.

DARK CIRCLE REMEDIES

काकडी कि बटाटा काय योग्य

बटाट्यामुळे डोळ्यांखालची त्वचा उजळते तर काकडीमुळे नैसर्गिक थंडावा मिळतो. त्यामुळे दोन्ही पर्याय डार्क सर्कल्ससाठी योग्यच आहेत

DARK CIRCLE REMEDIES

बटाट्याचा वापर

बटाट्याचा रस काढून तो डोळ्यांखाली १० मिनिटे चोळावा. रात्रभर हा रस तसाच ठेवावा. असे काही दिवस सलग केल्यास डार्क सर्कल्स गायब होतील.

DARK CIRCLE REMEDIES

काकडीचा वापर

बटाट्याच्या रसानंतर काकडीच्या चकत्या कापून डोळ्यांवर ठेवाव्या. डार्क सर्कल्समुळे थकलेली, कोरडी झालेल्या त्वचेला ओलावा मिळतो. त्वचा फ्रेश होते.

DARK CIRCLE REMEDIES

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

DARK CIRCLE REMEDIES

Fashion Tips : स्किन टोननुसार हेअर कलर कसा निवडावा? जाणून घ्या परफेक्ट शेड्स

HAIR COLOUR ACCORDING TO YOUR SKIN TONE ( | CHATGPT
येथे क्लिक करा