Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : नवीन घरात जाण्याचे स्वप्न अधुरे; बांधकामावर पाणी मारायला गेला अन् मृत्यूने गाठले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Jalgaon News : गावातच नवीन घराचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. यामुळे सचिन हा बांधकाम करण्यात आलेल्या घराच्या भिंतींवर पाणी मारण्याचे काम करत होता. घटनेच्या दिवशी देखील तो बांधकामाच्या ठिकाणी गेला

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : गावात नवीन घराचे बांधकाम सुरु असल्याने बांधकाम झालेल्या भिंतीवर रोज पाणी मारण्याचे काम केले जात होते. त्यानुसार दुपारच्या वेळी नळाला पाणी आल्याने मोटार लावून बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा जोरदार झटका लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंगळवाडे येथे घडली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील सचिन मनोहर पाटील (वय २८) असे सदर घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन हा कृषी उत्पादनांच्या मार्केटिंगचे काम करायचा. तर त्याचे आई- वडील शेती करतात. दरम्यान गावातच नवीन घराचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. यामुळे सचिन हा बांधकाम करण्यात आलेल्या घराच्या भिंतींवर पाणी मारण्याचे काम करत होता. घटनेच्या दिवशी देखील तो बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. 

मोटार सुरु करताच बसला झटका 

गावात दुपारच्या वेळी नळाला पाणी सोडण्यात आले होते. यामुळे सचिन हा नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी तसेच टाक्या भरण्यासाठी गेला होता. यासाठी पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला असता मोटर सुरू करताच त्याला विजेचा धक्का लागून तो फेकला गेला. त्याचा आवाज आल्याने आजूबाजूचे लोकांनी पाहिले असता तो जमिनीवर पडलेला होता व डाव्या हातात मोटरची वायर होती.

आई- वडिलांचा आधार गेला 
गावातील नागरिक धावून गेले असता त्यांनी विजेचा प्रवाह बंद एल. यानंतर सचिनला खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र याठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. सचिनच्या मृत्यूने आई- वडिलांचा आधार गेला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणं भोवलं, संजय गायकवाडांना दणका; अखेर पोलिसांत गुन्हा, VIDEO

शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा, युनेस्काच्या यादीत समावेश, जाणून घ्या नावे | VIDEO

Jai Shivaji : जय शिवाजी! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत, वाचा इतिहास| PHOTO

सावधान! दूधात तेल आणि चुना? तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध ? आमदारांनी डेमो दाखवला...कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT