Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली; अपघातात तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : जळगावात खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर काम करून मिळणाऱ्या पैशातून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी खवय्यांची गर्दी होत असल्याने रात्री घरी जाण्यास उशीर झाला होता.

Rajesh Sonwane

जळगाव : कामाला जळगावला येऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणावर काळाने झडप घातली आहे. रात्री कामावरून घरी जात असताना रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आला. यामुळे कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव ते कुसुंबा दरम्यान रात्रीच्या सुमारास घडली. 

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश घनश्याम सोनार (वय २६) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुसुंबा गावात तो आई आणि बहिणीसोबत वास्तव्यास होता. दरम्यान जळगावात (Jalgaon) खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर काम करून मिळणाऱ्या पैशातून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी खवय्यांची गर्दी होत असल्याने रात्री घरी जाण्यास उशीर झाला होता. मात्र सर्व काम आटोपून गणेश हा रात्री दहाच्या सुमारास जळगाववरून कुसुंबा येथे घरी (Accident) जाण्यासाठी निघाला. मात्र जळगाव- संभाजीनगर महामार्गावरील विमानतळाजवळ आला असता रस्त्यावर कुत्रा समोर आला. 

रात्रीच्या अंधारात महामार्गावरून दुचाकी चालवीत असताना अचानक कुत्रा समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी रस्त्यावर घसरली. यात तो खाली पडला. यानंतर त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT