Dharashiv News : आश्रम शाळा शिक्षक, कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन; भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

Dharashiv News : जागरण गोंधळ घालत आश्रम शाळांच्या शिक्षकांच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: आश्रम शाळांमधील शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव अदयाप प्रलंबित असून त्याला मंजूरी मिळावी; यासह विविध मागण्यांसाठीआश्रम शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत असून सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन झाले. 

Dharashiv News
Dharashiv News : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या व जिल्हा प्रशासनाच्या नावाने जागरण गोंधळ घालत आश्रम शाळांच्या शिक्षकांच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा एक वर्षांपासून प्रलंबित असलेला भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव मंजूर करावा. यासह (Ashram School Teacher) आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे दरमहा एक तारखेला मिळाले पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. 

Dharashiv News
Lasalgaon Accident : दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना अपघात; सीमा शुल्क विभागाचा चालक ठार, २ पोलीस कर्मचारी जखमी

प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा 

आश्रम शाळा शिक्षकांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आमच्या मागणीकडे लक्ष देऊन तात्काळ प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली आहे. शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ होण्यासाठी प्रस्तावाला प्रामुख्याने मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com