Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : कॉलेजला जाताना भरधाव डंपरने उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू, एकजण जखमी 

Jalgaon News : जळगावातून निघाल्यानंतर ममुराबाद रोडवर बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये फैजल पटेल व वासिक खान हे रस्त्यावर फेकले गेले

Rajesh Sonwane

जळगाव : मित्रांसोबत दुचाकीने महाविद्यालयात जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात जळगाव- ममुराबाद रस्त्यावर घडला. 

जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत राहणार फैजल मुस्ताक पटेल (वय २०) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. फैजल पटेल हा जळगाव- ममुराबाद रस्त्यावरील अरुणाबाई फार्मसी महाविद्यालय येथे फार्मसीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. दरम्यान १ मार्चला फैजल पटेल हा त्याचा वर्गातील मित्र वासिक खान युसुफ खान (वय २०) याच्यासोबत ममुराबाद येथील फार्मसी महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी दुचाकीने निघाला होता. 

रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू 

जळगावातून निघाल्यानंतर ममुराबाद रोडवर बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये फैजल पटेल व वासिक खान हे रस्त्यावर फेकले गेले. यात ते गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती त्यांच्या मित्रांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेत दोघानांही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी फैजल खान याला तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

जखमी मित्रावर उपचार सुरु 

सदरच्या अपघातात जखमी वासिक खान याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान महाविद्यालयीन तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून महाविद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

VIDEO: दादरमध्ये खळबळ, तरुणाच्या या इमारतीवरुन त्या इमारतीवर उड्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Blood Sugar Level: ब्लड शुगर टेस्ट करताय, तर या कॉमन चुका लगेच टाळा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT