Chandrapur News : सिमेंट प्रकल्पाने शंभर हेक्टर शेती धोक्यात; शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचे पुन्हा एक नवीन युनिट सुरू झाले आहे. गडचांदूर शहरात प्रकल्प असून आजूबाजूला थुटरा आणि गोपालपूर या गावांची शेती आहे
Chandrapur News
Chandrapur NewsSaam tv
Published On

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये तयार होणाऱ्या सिमेंटमुळे आजच्या परिसरातील सुपीक जमीन नापीक झाल्याचे भयानक वास्तव पुढे आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतातून येणाऱ्या उत्पन्नामध्ये घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचे पुन्हा एक नवीन युनिट इथे सुरू झाले आहे. गडचांदूर शहरात हा प्रकल्प असून आजूबाजूला थुटरा आणि गोपालपूर या गावांची शेती आहे. येथे कापूस, सोयाबीन, तूर ही महत्वाची पिके इथे घेतली जातात. मात्र गेल्या काही वर्षापासून ही शेती डोकेदुखी ठरली आहे. सिमेंट प्रकल्पातून निघणारे धूलिकण शेतात पसरत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. 

Chandrapur News
Nashik Police : नाशिकमध्ये एमडी ड्रग्स जप्त; रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई, दाम्पत्य ताब्यात

शेतीचा पृष्ठभाग झाला कडक 

रात्रंदिवस या प्रकल्पात सिमेंट उत्पादन सुरू असते. त्यामुळे प्रकल्पाच्या चिमण्यातून सारखी धूळ बाहेर पडते आणि ती आजूबाजूच्या गावात आणि शेत पिकांवर पडते. याशिवाय प्रकल्पातून जे दूषित पाणी बाहेर सोडले जाते त्यात सिमेंटचे प्रमाण असल्याने शेतीचा पृष्ठभाग कडक झाला आहे. धुळीने काळी माती पांढरी झाली आहे. या प्रदूषणाचा मोठा परिणाम देखील पिकांवर आणि जमिनीवर झाला आहे. सोबतच आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

Chandrapur News
Bird Flu : वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूची परिस्थिती नियंत्रणात; पोल्ट्री फार्मवर बारकाईने लक्ष

शंभर हेक्टर शेती बाधित 

शेतात जे काही पीक घेतले जाते, त्याचे उत्पादन घटले आहे. शिवाय गुणवत्तेवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. शेतात कितीही मेहनत घेतली तरी हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या प्रदूषणामुळे सुमारे शंभर हेक्टरवर शेती बाधित झाली आहे. शेतात आणि पिकांवर धुळीचे प्रमाण एवढे आहे की, शेतमजूर सुद्धा इथे काम करायला तयार नाही. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रकल्पाकडून कोणतेही प्रयत्न होत नाही. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आले आहेत. यापेक्षा कंपनीने आमची जमीन घेऊन घ्यावी, अशी विनंती ते करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com