Bird Flu : वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूची परिस्थिती नियंत्रणात; पोल्ट्री फार्मवर बारकाईने लक्ष

Washim news : जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत बर्ड फ्लू बाधित कोंबड्या आणि खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. मागील 24 तासात कुठेही बर्ड फ्लूची लागण झाल्याची घटना नाही
Bird Flu
Bird FluSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: राज्यातील अनेक भागात बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूमुळे सहा हजाराहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क होऊन पोल्ट्री फार्मवर लक्ष ठेवून असून जिल्ह्यातील बर्ड फ्ल्यूची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे इथल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याने सुमारे ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर वाशिम जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत बर्ड फ्लू बाधित सर्व कोंबड्यां आणि खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. मागील 24 तासात वाशिम जिल्ह्यात इतरत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाल्याची नवीन घटना उघडकीस आली नाही; अशी माहिती वाशिमचे अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांनी दिली.

Bird Flu
Saam Impact : जिल्हाधिकाऱ्यांचा ७ किमी पायी प्रवास; कालापाणी ते केलापानी रस्त्याचे काम करण्याबाबत आदेश

पोल्ट्री फार्मवर प्रशासनाचे लक्ष 

जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. प्रशासनाने उपाययोजना करत प्रशासनाकडून तालुकास्तरावर समिता गठित करून सर्व पोल्ट्री फार्मवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच पोल्ट्री फार्म चालकांना तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तथापी नागरिकांनी घाबरून जाऊ नये; असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

Bird Flu
Nashik Police : नाशिकमध्ये एमडी ड्रग्स जप्त; रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई, दाम्पत्य ताब्यात

हिंगोलीतही पशुवैद्यकीय विभाग ऍक्शन मोडवर 

राज्यभरात बर्ड फ्लू आजाराने डोके वर काढल्यानंतर हिंगोली मध्ये पशुवैद्यकीय विभाग ॲक्शन मोडवरती आला आहे. पशुवैद्यकीय विभागाने जिल्ह्यातील शेकडोंच्या संख्येने असलेल्या पोल्ट्री फॉर्म व्यावसायिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक केला आहे. पोल्ट्री फार्म परिसर यासह शेडमध्ये वेळोवेळी स्वच्छता करून औषध फवारण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर डॉक्टर प्रत्यक्षात पोल्ट्री फार्मवर जाऊन या रोगावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com