OBC Reservation Protest Jalna:  Saamtv
महाराष्ट्र

Laxman Hake Hunger Strike: लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी हालचाली; सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीत दाखल|VIDEO

OBC Protest Jalana: सगेसोयरेची व्याख्या बदलणार कशी? असा प्रश्न उपस्थित करीत शिष्टमंडळाकडून या सगळ्या मुद्द्यांवर लेखी मिळायला हवे तेव्हाच आम्ही उपोषण मागे घेऊ अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे.

माधव सावरगावे

जालना, ता. २१ जून २०२४

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्याच्या वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे उपोषणाला बसलेत. आज या उपोषणस्थळी राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेट देणार आहे. या भेटीत तोडगा निघणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे गेल्या ९ दिवसांपासून जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. सगेसोयरेची व्याख्या बदलणार कशी? असा प्रश्न उपस्थित करीत शिष्टमंडळाकडून या सगळ्या मुद्द्यांवर लेखी मिळायला हवे तेव्हाच आम्ही उपोषण मागे घेऊ अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे.

आज हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर हे चार नेते या शिष्टमंडळात आहेत. या शिष्टमंडळाच्या भेटीत तोडगा निघणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर रुग्णालयातून डीस्चार्ज मिळाल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटीकडे जाणार होते. याच मार्गावर सध्या लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू असून त्याच गावातून जरांगे पाटलांचा ताफा जाणार होता.

त्यामुळेच काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून अंतरवाली सराटी फाट्यावर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांच्या विनंतीनंतर जालन्याकडे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते थेट बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथे नियोजित दौऱ्यासाठी जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT