Manoj jarange patil saam Tv
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: मी कुठल्याच पक्षाचा नाही, मनोज जरांगे पाटील निर्णायक बैठकीआधी काय म्हणाले?

Manoj jarange Patil Press Conference: आज (२५, फेब्रुवारी) जरांगे यांनी मराठा बांधवांची बैठकही बोलावली आहे. बैठकीआधी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलनावरुन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

लक्ष्मण सोळुंके

Manoj jarange Patil Press Conference:

मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा बांधवांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शेकडो मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. बैठकीआधी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सरकारवर गंभीर आरोप केले.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"मी एका सामान्य घरातून आलो आहे. मराठा समाजावर प्रेम करतो, म्हणून हे घडलं. मी जर लबाड असतो तर इथंपर्यंत पोहोचलो नसतो. समजावर माझी निष्ठा आहे. त्यामुळे समाज माझ्यावर प्रेम करतो. कुणीतरी स्वप्न बघत आहे मराठ्यांना हरवायचं. आजची बैठक 3 नंतर घ्यायची होती, मात्र आता घ्यावी लागत आहे. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीसांवर गंभीर आरोप

सध्या जे घडतंय, माझ्यावर जे आरोप होत आहेत सगळं फडणवीसांमुळे (Devendra Fadanvis) घडत आहे. त्यामुळे आता निर्णायक निर्णय घ्यायचा आहे. महाराष्ट्रात दरारा निर्माण झाला आहे म्हणून त्यांना आता हे आंदोलन आणि मला संपवायचे आहे.

बैठक झाल्यानंतर सागर बंगल्यावर येतो, मला मारुन दाखवा. नारायण राणे यांनी अंबड तालुक्यातील दोन ते चार जण उचलून नेले ते आताही माझ्या विरुद्ध प्रेस घेतील. माध्यमांवर ही दबाव टाकला जात आहे. त्यात काही समन्वयक पण आहेत, असे खळबळजनक आरोप जरांगेंनी केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"सगेसोयऱ्यांचे आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच कुणबी नोदींचे दाखले देणे बंद झाले. महाराष्ट्रातील धनगर संपवायचा तुम्ही पर्याय देत आहात. तुम्ही कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात नाही पडू शकत नाही. समोरून तक्रारी नसताना ते काढणार का? कुणाच्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही नाही घुसू शकत," असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT