Maratha Reservation: ब्रेकिंग! जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

Maratha Aarskshan News: जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोकरदनमध्ये 70, हसनाबाद 15, बदनापूरमध्ये 100 पेक्षा अधिक, परतूरमध्ये 9 तर अंबडमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Maratha Reservation Update
Maratha Reservation UpdateSaam Digital
Published On

Maratha Reservation Protest:

सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. काल (२४, फेब्रुवारी) मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला होता. अशातच जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.

काल मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणसाठी मराठा बांधवांकडून जिल्ह्याजिल्ह्यात रास्तारोको करण्यात आला होता. या रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोकरदनमध्ये 70, हसनाबाद 15, बदनापूरमध्ये 100 पेक्षा अधिक, परतूरमध्ये 9 तर अंबडमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनोज जरांगेंच्या (Manoj jarange Patil) आदेशानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. काही भागात आंदोलक आणि पोलिसांत धक्काबुक्की झाल्याचेही प्रकार बघायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Maratha Reservation Update
Gulabrao Patil : निवडणुकांना एक वर्ष बाकी, निवडणुका आल्या म्हणून विकास काम करत नाही; मंत्री गुलाबराव पाटलांचे विरोधकांना उत्तर

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचे उल्लंघन आणि हुल्लडबाजी केल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी सरकारकरच्या आदेशानुसार हे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करत मराठा आंदोलकानी सरकारचा जाहीर निषेध केला आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation Update
Maharashtra Politics: थापेबाजीला अंत नाही; ३७० कलम हटवून फक्त राजकारण... संजय राऊतांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com