Wardha News
Wardha NewsSaam tv

Wardha News : २ कोटी ६४ लाखांच्या अपहार; महिला भुसंपादन अधिकारीचा शासकीय रकमेवर डल्ला

Wardha News : समुद्रपूर तालुक्यातील २५ वर्ष पूर्वी वाटप केलेल्या १६ प्रकल्पग्रस्ताच्या नावाने २ कोटी १३ लाख २८ हजार ३११ रुपये खोटे कागदपत्राच्या आधारे काढण्यात आले.

चेतन व्यास 
वर्धा
: शासकीय प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्याकरिता सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असतो. (Wardha) सोबत जमीन संपादित करण्याची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जबाबदारी दिली जाते. मात्र वर्धेत तत्कालीन महिला भुसंपादन अधिकारीने तब्बल दोन कोटी ६४ लाख रुपयाच्या शासकीय रकमेचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. (Breaking Marathi News)

Wardha News
Shahapur News : हॉटेलमध्ये धाडसी चोरी; मुंबई- आग्रा महामार्गावर मध्यरात्रीची घटना

स्वाती सूर्यवंशी या वर्धेच्या उपजिल्हाधिकारी, लघु सिंचन कालवे प्रकल्पच्या भुसंपादन अधिकारी म्हणून १७ फेब्रुवारी २०२२ ला रुजू झाल्या होत्या. वर्धा येथे या पदावर १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत म्हणजे २ वर्ष २६ दिवस कार्यरत होत्या. दरम्यान सूर्यवंशी यांनी या पदावर असतांना शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाली. यावरून जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम या कार्यालयातील कागदपत्र सील करत समिती स्थापन करून चौकशीला सुरवात केली. चौकशीत समुद्रपूर तालुक्यातील २५ वर्ष पूर्वी वाटप केलेल्या १६ प्रकल्पग्रस्ताच्या नावाने २ कोटी १३ लाख २८ हजार ३११ रुपये खोटे कागदपत्राच्या आधारे काढण्यात आले. तर कोषागार कार्यालयातील शासकीय खात्यातून पाच लोकांच्या नावे ५० लाख ८५ हजार ४२४ रुपये दोन पतसंस्थेत बनावटी खाते तयार करून  वळत केल्याची बाब समोर आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha News
Nalasopara Accident : कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून कारची तोडफोफ

सूर्यवंशी यांनी केलेल्या अपहार प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. २५ वर्षांपूर्वी निवड झालेल्या प्रकल्पच्या नावाने ज्या (Farmer) शेतकऱ्यांचे नाव निवड्यात नाही. मोबदला मिळण्याबाबत अर्ज सुद्धा सादर केला नाही; अश्या लोकांच्या नावाने पैसे काढण्यात आले. सोबतच या प्रकरणात वर्धेच्या शेतकरी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या, वर्धा व आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था, हिंगणघाट यांच्यासोबत सूर्यवंशी यांनी संगणमत करून बनावटी कागदपत्रांच्या आधारे खोटे खाते तयार करून पैसे काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ माजली असून महिला उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर या पूर्वी सुद्धा काही प्रकरणात कारवाई झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सदर महिला अधिकाऱ्याची बदली होताच या विभागात अपहार झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना मिळाली. जिल्हाधिकारी यांनी तातडीने समिती गठीत करत कागदपत्रांची तपासणी केली. यावरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. प्रकरणी वर्धा शहर पोलिसात (Police) तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार व कोणाला कोणाला अटक करणार; हे आता येत्या काळातच कळेल. यातील मुख्य आरोपी स्वाती सूर्यवंशी या सध्या परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सामान्य या पदावर कार्यरत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com