praful patel NCP News Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत प्रफुल्ल पटेलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

praful patel NCP News: प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची घोषणा गोयल यांनी केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले.

Namdeo Kumbhar

Praful Patel reaction on NCP president appointment : प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड झाल्याची माहिती भाजप नेत्याने कशी दिली? प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्ष म्हणून निवड कधी झाली? पटेल हा पवारांचा पक्ष खलसा करणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होते. गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पटेल अध्यक्ष झाल्याचा दावा केला होता. यावर आता प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याच्या बातम्या खोट्या अन् निराधार आहेत. असा कोणताही निर्णय झालेला नाही. असा निर्णय जेव्हा होईल, तेव्हा तो सर्वांना विश्वासात घेऊन अधिकृत पद्धतीनेच जाहीर केला जाईल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. त्यांनी भाजप नेत्यांच्या दावा खोडून काढला. पण गोयल यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलेले आहेच.

प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर पोस्ट करत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. माध्यमांमध्ये त्यांच्या निवडीबाबत ज्या बातम्या येत आहेत, त्या पूर्णपणे बिनबुडाच्या (Baseless) आहेत. त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पटेल यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलेय.

राष्ट्रवादी काँग्रेस हा एक लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. अध्यक्षपदासारख्या मोठ्या पदाचा निर्णय कोणीही एकटा घेऊ शकत नाही. त्यासाठी प्रक्रिया महत्त्वाची आहे. पक्षातील मोठे नेते आणि निवडून आलेल्या आमदारांशी, पक्षाचे काम पाहणाऱ्या महत्त्वाच्या लोकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. अध्यक्षपदाची निवड करताना पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनाही लक्षात घेतल्या जातात, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय. राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष आहे, आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पूर्वीपासून चालत आलेल्या प्रक्रियेनुसारच होते, असे ते म्हणाले.

श्रीमान पियुष गोयल हे माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी वा सदस्य नाहीत.ते अशा पक्षाचे एक मोठे नेते आहेत जो पक्ष इतर पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष न देता स्वपक्ष वाढवतो.अटलजी कडून ते काही शिकले नसावेत.अशा कठीण काळात निदान मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जी सामंजस्याची भूमिका दाखवली तितकी जरी आत्मसात केली तरीही दादांच्या सामान्य कार्यकर्त्याला समाधान वाटेल.
अमोल मिटकरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT