IPL Auction 2023, Mukesh Kumar Saam TV
महाराष्ट्र

IPL Auction : रिक्षाचालकाच्या मुलाचं नशीब फळफळलं; एका सामन्यात मिळायचे ५०० रुपये, आयपीएलने बनवलं करोडपती!

आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंवरही चांगलीच बोली लागली.

Satish Daud

IPL Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या सीझनसाठी शुक्रवारी (२३ डिसेंबर) कोचीमध्ये मिनी लिलाव पार पडला. या लिलावात केवळ ८० खेळाडू विकले गेले. यामध्ये प्रामुख्याने विदेशी खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी १० संघांनी मिळून एकूण १६७ कोटी रुपये खर्च केले. दरम्यान, या मिनी लिलावाने एका रिक्षाचालकाच्या मुलाला एका रात्रीत करोडपती बनवलं. (Latest Marathi News)

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंवर सर्वाधिक बोली

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जास्त रक्कम यावेळी झालेल्या आयपीएल (IPL 2023) लिलावात दिली गेली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला यावेळी सर्वाधिक १८.५० कोटी रुपयांची बोली लागली. करनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन १८.५० कोटी, बेन स्टोक १५.५० कोटी, आणि निकोलस पूरन १६ कोटींमध्ये विकला गेला. (Sports News)

रिक्षाचालकाचा मुलगा बनला करोडपती

दरम्यान, या मिनी ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंवरही चांगलीच बोली लागली. युवा अनकॅप खेळाडू मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने ५.५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. मुकेशचे वडील कोलकात्यात रिक्षा चालवायचे. गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. मुकेशची बेस प्राईस किंमत २० लाख रुपये होती. त्याला त्याच्या बेस प्राईसच्या २७ पट अधिक किंमत मिळाली आहे.

कोण आहे मुकेश कुमार?

मुकेशबद्दल बोलायचे झाले तर तो बिहारमधील गोपालगंजचा रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. मुकेशने सैन्यात भरती होण्यासाठी तीनदा प्रयत्न केला होता. मात्र, तीनही वेळा तो अपयशी ठरला. मुकेशला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. आपल्या खेळाच्या जोरावर त्याने बिहारच्या अंडर-१९ संघातदेखील एन्ट्री केली होती.

एका सामन्यासाठी मिळायचे ५०० रुपये

दरम्यान, मुकेशने कोलकात्यात एका खासगी क्लबसाठी खेळायला सुरूवात केली. त्याला एक सामना खेळायचे केवळ ५०० रुपये मिळायचे. २०१४ मध्ये त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवड चाचण्यांमध्ये भाग घेतला.२०१५ मध्ये मुकेशने बंगालसाठी पदार्पण केले.

मुकेश कुमारची टीम इंडियात झाली होती निवड

टीम इंडियाच्या नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका मालिकेत मुकेशची निवड करण्यात आली होती. मात्र, तेथे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मुकेश हा दिल्ली कॅपिटल्स संघातील फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करायचा. तो उजव्या हाताचा गोलंदाज असून दिल्लीचा कोच रिकी पाँटिंगने त्यांची प्रतिभा ओळखली होती.

मुकेश कुमारची प्रथम श्रेणी कारकीर्द

मुकेश कुमारने ३३ प्रथम श्रेणी सामन्यात १२३ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ वेळा एका डावात ४ आणि ६ वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने २४ लिस्ट ए सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत. T20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर मुकेशने २३ सामन्यात २५ विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

वांगणीत रेल्वे प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी'; वनविभागाची परवानगी न घेता भूयारी मार्गाचं काम, चूक लक्षात येताच जागा बदलली

Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

SCROLL FOR NEXT