IPL Auction 2023 : चुकीला माफी नाही! दोन वर्षापूर्वी केलेल्या चुकीची शिक्षा, 'हा' खेळाडू राहिला अनसोल्ड

ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर अॅडम झाम्पाला कोणत्याही फ्रँचायझीने खरेदीसाठी उत्सुकता दाखवली नाही.
IPL 2022 Final
IPL 2022 Finalsaam tv
Published On

IPL Auction 2023 : आयपीएल 2023 साठीचा मिनी लिलाव आज कोची येथे पार पडला. आजच्या लिलावात खेळाडूंवर फ्रँचायझींनी अक्षरश: पैशांचा वर्षाव केला. मात्र खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चढाओढ करणाऱ्या संघांमध्ये एका खेळाडूसाठी एकी दिसून आली. या खेळाडूला सर्वच फ्रँचायझींनी जाणूनबुजून खरेदी केलं नाही अशी चर्चा आहे.

ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर अॅडम झाम्पाला कोणत्याही फ्रँचायझीने खरेदीसाठी उत्सुकता दाखवली नाही. अॅडम झाम्पाची बेस प्राईज दीड कोटी रुपये होती. मात्र कोणीही त्याला खरेदी केले नाही, त्यामुळे तो अनसोल्ड राहिला. (Sports News)

IPL 2022 Final
IPL Auction 2023 मध्ये काव्या मारनचा दबदबा; अर्धा तासात खर्च केले 22 कोटी, तरीही होतेय ट्रोल

आता फ्रँन्चायझींनी असं का केलं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला दोन वर्ष मागे जावं लागेल. अॅडम झाम्पाने आयपीएल 2021 सीझन मध्येच सोडला. 2021 मध्ये भारतात कोरोनाच्या लाटेमुळे आयपीएल 2021चा सीझन मध्येच थांबवावा लागला होता.

पण अॅडम झाम्पा स्पर्धा थांबवण्याच्या खूप आधी भारत सोडून ऑस्ट्रेलियाला निघून गेला होता. भारत सोडल्यानंतर त्याने केलेलं एक वक्तव्य चर्चेत होतं. अॅडम झाम्पाने सिडनी मॉर्निंग हेराल्डला 2021 मध्ये सांगितले होते की, त्याला भारतात सर्वात असुरक्षित वाटत होतं.  (IPL 2023)

IPL 2022 Final
IPL Auction 2023: आयपीएलच्या लिलावात अनेक प्लेअर्स मालामाल; कोण ठरले महागडे खेळाडू?

अॅडम झाम्पाला त्याच्या याच चुकीची शिक्षा आता भोगावी लागली आहे. गेल्या वर्षी आयपीएल 2022 मध्ये मेगा लिलावात देखील कोणत्याही संघाने अॅडम झाम्पावर बाजी लावली नव्हती. फ्रँन्चायझींनी झाम्पाला खरेदी न करण्याचं कारण समोर आलं नसलं तरी सर्वत्र हीच चर्चा सुरु आहे. आयपीएल 2023 सीझनच्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांना नाव दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com