IPL Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या नवीन हंगामासाठी मिनी लिलाव कोची येथे पार पडलाय. या मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सीईओ काव्या मारन यांनी खेळांडूवर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र एकीकडे लिलाव सुरु असताना काव्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. मात्र यावेळी यूजर्स काव्याला जोरदार ट्रोल केले आहे.
झालं असं की, सनरायझर्स संघाने इंग्लंडचा युवा आणि आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले. तर मयंक अग्रवालसाठी 8.25 कोटींची बोली लावली. काव्या आणि हैदराबाद संघाची बोली इथेच थांबली नाही. हैदराबादने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्री क्लासेनला देखील 5.25 कोटी रुपयांना आणि विव्रत शर्माला 2.60 कोटी रुपयांना खरेदी केले. (Sports News)
मिनी लिलावात काव्या मारन आणि तिच्या फ्रँचायझीने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. तिने पैशांची उधळण केली आणि अनेक खेळाडू खरेदी केले. यानंतर युजर्सनी काव्या मारनला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली. (IPL 2023)
एका यूजरने अजय देवगनच्या सिनेमातील डायलॉग पोस्ट करत लिहिले की, काव्याने सुरुवातीला दोन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 22 कोटी रुपये खर्च केले.काव्याला सांगायचे आहे की जर एखादी महागडी वस्तू सापडली नाही, तर स्वस्त वस्तू महागात खरेदी करा.
कोण आहे काव्या मारन?
काव्या मारन प्रसिद्ध उद्योगपती कलानिथी मारन यांची कन्या आहे. कलानिधी हे सन ग्रुपचे संस्थापक आहेत. कलानिथी विविध टेलिव्हिजन चॅनेल, एफएम रेडिओ स्टेशन्स, डीटीएच सेवा, वर्तमानपत्रे आणि एका फिल्म प्रोडक्शन हाऊसचे मालक आहेत. काव्या मारनने न्यूयॉर्क विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लिओनार्ड एन स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले आहे. यापूर्वी काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.