IPL 2023 Auction, Mumbai Indians Squad : १४ सामन्यांत १० पराभव आणि फक्त ४ विजय, गुणतालिकेत अखेरचं स्थान...मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२ स्पर्धा खूपच निराशाजनक राहिली. रोहित शर्माच्या या संघात एकापेक्षा एक दिग्गज होते. पण संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. आता मुंबई इंडियन्सनं आपली कामगिरी सुधारण्यासाठी आयपीएल २०२३ ऑक्शनमध्ये सर्व तयारी केल्याचं दिसतं.
या संघानं १७.५० कोटी रुपये मोजून कॅमरन ग्रीनला संघात घेतलंय. ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. तर मुंबई इंडियन्समधील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. (Sports News)
कॅमरन ग्रीन हा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आहे. स्फोटक फलंदाजीसाठी त्याला ओळखले जाते. या खेळाडूनं पहिल्यांदाच आयपीएल ऑक्शनसाठी नाव दिलं आणि त्याच्यावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. (IPL 2023)
मुंबई इंडियन्सनं कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?
रोहित शर्मा, टीम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्ज, ब्रेव्हिस, आर्चर, बुमराह, अर्जुन तेंडुलकर
या खेळाडूंना केलं रीलीज
कायरन पोलार्ड, रायली मेरिडिथ, डेनियल सॅम्स, मयांक मार्कंडेय, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंह, जयदेव उनाडकट, फाबियान एलेन, तिमाल मिल्स, संजय यादव, आर्यन जुयाल, बासिल थंपी
असा असेल मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ
रोहित शर्मा, कॅमरन ग्रीन, टीम डेव्हीड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्ज, ब्रेव्हिस, आर्चर, बुमराह.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.