ठाकरेसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलाय... आदित्य ठाकरेंवर त्याच्याच पक्षातील खासदार नाराजी असल्याची चर्चा आहे... मात्र खासदारांच्या नाराजीचं कारण नेमकं काय आहे? आदित्य ठाकरेंनीही नाराजीनाट्यात कसा सहभाग घेतलाय... ठाकरेसेनेतील हा वाद कसा उफाळून आला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
ठाकरेसेनेनं मुंबईत खासदारांची बैठक बोलावली... बैठकीला कारण होतं...ठाकरेसेनेतील खासदारांच्या फुटीवरून राज्यात सुरु असलेल्या चर्चा...मात्र ही चर्चा बाजूला राहीली आणि बैठकीत पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली... खासदारांच्या या बैठकीला आदित्य ठाकरेंही उपस्थित होते.. या बैठकीत आदित्य ठाकरेंनी खासदारांशी कुठलाच संवाद साधला नाही. आणि आदित्य ठाकरे नाराज असल्याची चर्चा रगंली.. आपल्याच खासदारांशी आदित्यनं बोलणं का टाळलं...त्याचं कारण आहे...
पाच दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या घरी झालेली खासदांरांची बैठक.मराठवाड्याच्या खासदारानं या बैठकीत आदित्य ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंना प्रकृतीच्या कारणामुळे राज्यात फिरताना मर्यादा पडतात, पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं असं मत त्या खासदारानं व्यक्त केलं.
खासदाराच्या याचं विधानामुळे आदित्य ठाकरे नाराज झाले आणि नंतर झालेल्या खासदारांच्या बैठकीत त्यांनी बोलणं टाळलं. एकीकडे खासदारांवर आदित्य ठाकरे नाराज असताना दुसरीकडे प्रियंका चर्तुर्वेदींनी पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून याच बैठकीत उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केलीय...आणि या बैठकीला संजय राऊत मात्र उपस्थित नव्हते.
ठाकरेसेनेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मला निषेध नोंदवायचा आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं?
उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे
उद्धव ठाकरे म्हणाले, राऊत बोलले म्हणून काय झालं शेवटी निर्णय मीच घेईल
दरम्यान ही बैठक संपल्यानंतर एका खासदाराने तर प्रियंका चतुर्वेदीच्या 6 वर्षांच्या कामगिरीवरच ठाकरेंसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केल... प्रियंका चतुर्वेदींनी सहा वर्ष नेमकं काय केलं? असा सवाल एका खासदारांनं विचारल्यानं अंतर्गत गटबाजी समोर आलीय...आता त्यावरून विरोधकांनी ठाकरेसेनेवर चांगलाच निशाणा साधलाय..मात्र संजय राऊतांनी या सर्व चर्चां फेटाळून लावल्यात..
राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत चांगलाच पेच निर्माण झाला होता... आदित्य ठाकरेंनी ठाकरेसेनेला राज्यसभेची जागा मिळावी यासाठी आग्रही भूमिका मांडली होती...अशातच पक्षांतर्गत धूसफुस आणि आदित्य ठाकरेंवर खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे ठाकरेसेना हे अंतर्गत वाद कसे शमवणार हा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.