Women Health : पीरियड्स अनियमित असतील तर रोजच्या या ५ चुका टाळा; PCOS चा त्रास वाढू शकतो

Pcos symptoms : पीरियड्स अनियमित असणे ही आजकाल अनेक महिलांमध्ये एक सामान्य समस्या बनली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत हे बदल करणे गरजेचे आहे.
5 Daily Habits That Worsen Irregular Periods and PCOS
5 Daily Habits That Worsen Irregular Periods and PCOS saam tv
Published On: 

महिलांमध्ये आढळणारी PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही केवळ मासिक पाळीशी संबंधित समस्या नाही. या स्थितीचा परिणाम शरीरातील हार्मोन्स आणि चयापचय प्रक्रियेवरही होऊ शकतो. मासिक पाळी अनियमित होणे, चेहऱ्यावर मुरुम येणे, वजन वाढणे किंवा हनुवटीवर अनावश्यक केस येणे अशी लक्षणे काही महिलांमध्ये दिसतात. मात्र, दैनंदिन जीवनातील काही चुका या त्रासाचे व्यवस्थापन अधिक कठीण करू शकतात.

PCOS नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. त्यामुळे रोजच्या जीवनात कोणत्या पाच चुका टाळायला हव्यात, जाणून घेऊया.

5 Daily Habits That Worsen Irregular Periods and PCOS
Eye Care Tips : डोळ्यांची दृष्टी नकळत होतेय कमजोर? रोजच्या या ८ सवयी असू शकतात कारण, वेळीच सावध व्हा

PCOSला फक्त मासिक पाळीची समस्या समजू नका

अनेक महिलांना मासिक पाळी अनियमित असणे म्हणजेच PCOS असे वाटते. मात्र, या समस्येचा संबंध हार्मोन्स आणि शरीराच्या चयापचय प्रक्रियेशीही असतो. काही महिलांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स, वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरुम येणे आणि अनावश्यक केस वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे मासिक पाळी नियमित झाली तरी इतर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

वजन कमी करण्यासाठी जेवण टाळू नका

PCOS असल्यास वजन कमी करण्यासाठी अनेक महिला जेवण कमी करतात किंवा पोळी-भात पूर्णपणे बंद करतात. मात्र, हा योग्य मार्ग नाही. शरीराला आवश्यक पोषक घटक मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.आहारात हिरव्या पालेभाज्या, प्रथिने, संपूर्ण धान्य, फायबर आणि आरोग्यदायी चरबीचा समावेश करा. दुसऱ्यांचा डाएट प्लॅन पाहून तो स्वतःसाठी लागू करण्याऐवजी आपल्या शरीराच्या गरजेनुसार आहार ठरवा.

व्यायामापासून दूर राहू नका

हार्मोन्सचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दररोज अनेक तास जिममध्ये घालवण्याची गरज नाही. चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखे व्यायामही फायदेशीर ठरू शकतात.सामान्यतः आठवड्यातून १५० ते ३०० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम आणि किमान दोन दिवस स्नायू बळकट करणारा व्यायाम करण्याची शिफारस केली जाते. नियमित हालचाल केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

5 Daily Habits That Worsen Irregular Periods and PCOS
Eye Care Tips : डोळ्यांची दृष्टी नकळत होतेय कमजोर? रोजच्या या ८ सवयी असू शकतात कारण, वेळीच सावध व्हा

आरोग्य तपासण्या पुढे ढकलू नका

PCOS चा परिणाम केवळ मासिक पाळीवर होत नाही. काही महिलांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वेळोवेळी रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.किती अंतराने तपासण्या कराव्यात, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षणे कमी झाली म्हणून तपासण्या टाळणे योग्य नाही.

PCOS ची लक्षणे नोंदवून ठेवा

मासिक पाळी कधी आली, किती दिवस चालली, मुरुम कधी वाढले किंवा वजनात किती बदल झाला, याची नोंद ठेवणे फायदेशीर ठरते. यासाठी मोबाईलमधील कॅलेंडर किंवा पीरियड ट्रॅकिंग अॅपचा वापर करू शकता. या नोंदींमुळे डॉक्टरांना तुमच्या आरोग्यातील बदल समजून घेण्यास मदत होते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोनल औषधे किंवा सप्लिमेंट्स घेणे टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.