sharad pawar Saam tv
महाराष्ट्र

Solapur Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; पक्षश्रेष्ठींपर्यंत विषय जाणार

Solapur Political News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. सोलापूरच्या पदाधिकाऱ्याने पक्षातील अंतर्गत विषय पक्षश्रेष्ठींपर्यंत घेऊन जाणार असल्याचं म्हटलं आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्याआधी त्यांच्या पक्षात नाराजीनाट्य पेटलं आहे. एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसने आगामी निवडणुकीसाठी तयारी केली आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकीआधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरु झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाारामुळे पक्षाची ताकद कमी झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे तौफिक शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे.

शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहे. सोलापुरात राष्ट्रवादी शहर आणि ग्रामीण भागाचा मेळावा भरवण्यात आला आहे. या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांची मुख्य उपस्थिती आहे. या मेळाव्यात बसायला खुर्ची दिली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शहरचे कार्याध्यक्ष तौफिक शेख हे भरसभेतून निघून गेले.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेत पक्षाची ताकद कमी झाल्याचा आरोप तौफीक शेख यांनी केला. येत्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा सुद्धा कार्याध्यक्षांनी दिला आहे. शरद पवाराची उद्या भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय टाकणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मेळाव्यात नेमकं काय घडलं?

सोलापुरात शरद पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात नाराजीनाट्य पाहायला मिळाली. हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोरच महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची नाराजी दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख बैठकीतून संतापून निघाले. आम्हाला पक्षामधून कोणत्याही पद्धतीची सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यामुळे मी बैठकीतून निघून जात आहे. त्याचबरोबर महिला पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या समोरच मोठमोठ्याने ओरडून नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

SCROLL FOR NEXT