
सोलापूरमध्ये मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरत असल्यामुळे तरुणाने आईची हत्या केली. अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथे ही घटना घडली. या घटनेमुळे अक्कलकोटमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या गर्लफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट दक्षिण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाने निर्घृण हत्या केली. अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर गावामध्ये ही घटना घडली. भिमाबाई हनुमंत कळसकोंडा असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सिन्नूर गावामध्ये भिमाबाई आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. त्यांचा मुलगा रमेश कळसकोंडा याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. पण या प्रेमसंबंधाला भिमाबाई यांनी विरोध केला.
रमेशचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमाला भिमाबाई कळसकोंडा यांचा विरोध होता. याच गोष्टीवरून रमेशचे आईसोबत वारंवार भांडण व्हायचे. प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे रमेशचा आईवर प्रचंड राग होता. शेवटी त्याने आपल्या गर्लफ्रेंडला सोबत घेऊन आईची हत्या करण्याचा कट रचला. गावाजवळील शेतामध्ये रमेशची आई भिमाबाई काम करत होत्या. त्याठिकाणी आईला गाठून रमेशने साडीनेच गळा आवळून तिची हत्या केली. या घटनेमुळे अक्कलकोटमध्ये खळबळ उडाली असून अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात रमेश आणि तिच्या गर्लफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.