Indorikar Maharaj Daughter Engagement Saam Tv
महाराष्ट्र

Indorikar Maharaj Daughter Engagement: नाव ठेवायची तर ठेवा... लेकीच्या साखरपुड्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना इंदोरीकर महाराजांनी सुनावलं

Indorikar Maharaj Reaction on Daughter Engagement: सध्या निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) हे चर्चेत आले आहेत. त्यांच्या लेकीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

Siddhi Hande

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) हे नेहमीच चर्चेत असतात. ते नेहमी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. दरम्यान, इंदोरीकर महाराज आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. ते म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा. इंदोरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला. त्यानंतर आता साखरपुड्यानंतर त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. यावरच आता निवृत्ती महाराजांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवृत्ती महाराजांच्या लेकीचा साखरपुडा ४ नोव्हेंबरला झाला. अहिल्यानगरमधील संगमनेर येथे वसंत लॉन्स या ठिकाणी हा साखरपुडा पार पडला. त्यांच्या लेकीचं नाव ज्ञानेश्वरी इंदोरीकर आहे. त्यांनी साहिल चिलप यांच्यासोबत साखरपुडा केला.

ज्ञानेश्वरी इंदोरीकर यांच्या साखरपुड्याला लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. अनेक राजकीय मंडळींनीही उपस्थिती लावली होती. खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार बाळासाहेब थोराद, सत्यजीत तांबे हजर होते.दरम्यान, या कार्यक्रमासाठी खूप खर्च करण्यात आल्याचे दिसत आहे. यावरुन त्यांना ट्रोल केले. त्यानंतर आता इंदोरीकर महाराजांनी उत्तर दिले आहेत.

इंदोरीकर महाराज नेमकं काय म्हणाले?

साखरपुड्याच्या सोहळ्याला कोणताही सत्कार सोहळा ठेवला नाही,त्याऐवजी १ लाख ११ हजारांची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये हे पैसे देण्यात आले.

इंदोरीकर महाराज म्हणाले की, मी लग्न साध्या पद्धतीने करा असं सांगतो आणि लेकीचा साखरपुडा थाटामाटात केला. हे त्यांना दाखवण्यासाठीच आहे की, आपण बदल करु शकतो. आपल्यात बदल करण्याची ताकद आहे. कार्यक्रमात जेवण वाढवणारे वारकरी वेशात होते. जेवण महाराष्ट्रीन होतं, चायनीज नव्हतं, व्याही भेटीचा कार्यक्रम बंद केला. तुम्हाला नाव ठेवायची असेल तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला राळेगण सिद्ध येथे दाखल..

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT