Sangamner Crime : ५० रुपयांसाठी शिक्षकाच्या डोक्यात टाकला दगड; दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून कृत्य

Ahilyanagar News : रस्त्यावर अडवत पैसे न दिल्याने मारहाण झाल्याची घटना घडली असून संगमनेर शहरात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहराच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज
Sangamner Crime
Sangamner CrimeSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : दारूची नशा भागविण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र दारू प्यायला ५० रूपये दिले नाही; या कारणातून एका १७ वर्षीय मुलाने रस्त्याने जाणाऱ्या शिक्षकाच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना संगमनेर येथे समोर आली आहे. प्राणघातक हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास वाघमारे हे ६ ऑगस्टच्या रात्री रस्त्याने जात होते. यावेळी त्यांना एका तरुणाने अडवले. आधीच नशेत धुंद असलेल्या तरुणाने वाघमारे यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५० रुपयांची मागणी केली. मात्र वाघमारे यांनी त्या तरुणाला नकार देताच संबंधित तरुणाने त्यांना खालीपाडून मारहाण केली आणि बाजूला पडलेला दगड उचलून डोक्यात टाकला. 

Sangamner Crime
Nandurbar Political News : नंदुरबारमध्ये भाजप शिवसेना वाद विकोपाला; भाजप आमदाराचा शिंदे आमदारावर गंभीर आरोप

मारहाण केल्यानंतर खिशातून रक्कम काढून पसार 

डोक्यात दगडाने मारहाण केल्याने सुहास वाघमारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. यात त्यांच्या डोक्यावर, कानावर गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपी तरुणाने अत्यव्यवस्थ पडलेल्या वाघमारे यांच्या खिशातील रक्कम घेऊन पोबारा केला. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी जखमी वाघमारे यांना बघितल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

Sangamner Crime
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी शेवटची लढाई, एकत्र या; जरांगे पाटील यांचे आवाहन

तरुणावर गुन्हा दाखल करत घेतले ताब्यात 

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिसरातील देशी दारूच्या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी वाडेकर गल्ली परिसरातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी सदर तरूणास ताब्यात घेतले आहे. जखमी सुहास वाघमारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com