Nandurbar Political News : नंदुरबारमध्ये भाजप शिवसेना वाद विकोपाला; भाजप आमदाराचा शिंदे आमदारावर गंभीर आरोप

Nandurbar News : माझ्या टार्गेटला शिंदे सेनेचे दोन आमदार असून आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे १२ बंगले, पत्नीकडे ४ बंगले यासोबतच घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप आमदार विजयकुमार गावित यांनी केला
Nandurbar Political News
Nandurbar Political NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात महायुतीमध्ये फूट पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांचा वाद विकोपाला गेला आहे. यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असून भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी शिवसेनेच्या दोन्ही आमदारांवर निशाणा साधला आहे. यात शिवसेना आमदाराची मस्ती जिरवायची आहे; अशा शब्दात निशाणा साधला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीमध्ये तेढ निर्माण झाली असून मागच्याच आठवड्यात भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी एकला चलो रे ची भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर आमदार गावित यांनी शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातच महायुतीमधल्या घटक पक्षामधील आमदारामध्येच वाकयुद्ध सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Nandurbar Political News
Buldhana Police : कर्नाटकातील चित्रपट निर्मात्यासह सहकाऱ्यांना धमकावत घेतले पैसे; चिखलीच्या पाच वाहतूक पोलिसांवर गुन्हे दाखल

मस्ती जिरवायचीय 

मला शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांची मस्ती जिरवायची असून जिल्ह्यात महायूती करु नका असे पक्षश्रेष्ठींना सांगितले असल्याचे भाजपा आमदार डॉ. विजयकुमार गावित म्हणाले आहेत. जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना भाजपा आमदार माजीमंत्री डॉ विजयकुमार गावित शिंदे गटाच्या आमदारांवर चांगलेच घसरले असल्याचे पाहण्यास मिळाले.  

Nandurbar Political News
Pimpri Chinchwad Police : ५७ गुन्हेगारांवर एकाचवेळी मोका अंतर्गत कारवाई; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

आमदाराच्या पत्नी व मुलाने घरकुलाचा लाभ घेतल्याचा आरोप 

आमदार आमश्या पाडवी करदाते असतांना त्याच्या पत्नीच्या नाववार १४ घर असतांना पत्नी आणि मुलाने पंतप्रधान आवास योजना तसेच शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतला असल्याचा आरोप डॉ. विजयकुमार गावित यांनी केला आहे. त्यामुळे आमदारांच्या पत्नी आणि मुलाने घरकुलाचा लाभ घेतल्याचा थेट आरोप डॉ विजयकुमार गावितांनी केला आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपा शिंदे गटाचे आमदार एकमेंकाचे उणेदूणे काढतांना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com