Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी शेवटची लढाई, एकत्र या; जरांगे पाटील यांचे आवाहन

Sangli News : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय. येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे याच पार्श्वभूमीवर सांगलीत समाजाला एकत्र येण्याचे आवाहन
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

सांगली : मराठा आरक्षणाची आणि माझी ही शेवटची लढाई असणार आहे. शरीर साथ देत नसून आरक्षणासाठी शेवटची लढाई लढायची आहे. यामुळे मराठा समाजातील नेत्यांनी एकत्र यावे; असे आवाहन मुंबईच्या आझाद मैदानावर करण्यात येणाऱ्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. येत्या २९ ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे. २७ ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील हे मराठा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रवाना होणार आहेत. यापूर्वी त्यांनी सांगली येथे येत मराठा समाज बांधवांना आवाहन केले आहे.

Manoj Jarange Patil
Pimpri Chinchwad Police : ५७ गुन्हेगारांवर एकाचवेळी मोका अंतर्गत कारवाई; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

शेवटची पण रेकॉर्ड ब्रेक लढाई 

ही लढाई शेवटची आहे. मी थकलो आहे. समाजाचा थोड्या दिवसाचा पाहुणा राहिलो आहे. माझे शरीर साथ देत नाही. त्यामुळे हे रेकॉर्ड ब्रेक लढाई होणार आहे. मराठा समाजातील नेते जागृत करण्यासाठी शांततेत मुंबईत जाणार आहे. सांगलीच्या क्रांतिकारक भूमीतून मी आव्हान करतो की मराठा समाजाचे नेत्यांनी एकत्र येण्याची विनंती आहे. अंतिम लढ्यात साथ द्यावी; असे आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 

Manoj Jarange Patil
Nandurbar Political News : नंदुरबारमध्ये भाजप शिवसेना वाद विकोपाला; भाजप आमदाराचा शिंदे आमदारावर गंभीर आरोप

मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणे अशक्य 
तर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार या चर्चेवर जरांगे म्हणाले, कि धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपद हे स्वप्नात पण आणू नये. तसेच अजित पवारांची सत्ता सुद्धा संपेल, असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे. अजित पवार पालकमंत्री आणि बीडमध्ये येऊन नाही चालणार. प्रशासन निर्वाचक ठेवणे गरजेचे आहे. बीड मधील प्रशासन वेगळे आहे. परळी तालुक्यातील स्टाफ वगळावे. दुसऱ्या जिल्ह्यातील स्टाफ भरती करावे. नुसतं पालकमंत्री होऊन उपयोग नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com