देशातील सरकार जनतेचे नसून आदानीचे आहे. महागाईमुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. देशाचा पंतप्रधान तुमच्या सोबत नाही, राज्यातील खाेके सरकार तुमच्यासाठी काहीही करत नाहीये. हे तुम्ही पाहत आहात. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि कायम तुमच्यासाठी राहणार असा विश्वास इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण पाेहचविला पाहिजे असे मत आमदार प्रणिती शिंदे (mla praniti shinde) यांनी व्यक्त केला. (Maharashtra News)
संसदेतील खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात सोलापुरात आज (शुक्रवार) इंडिया आघाडीच्या (india aghadi) वतीने निदर्शन करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र शब्दात समाजार घेतला.
आमदार शिंदे म्हणाल्या सामान्य लोकांना आता भाजप नको झाले आहे त्यामुळे आता इंडिया आघाडीने एकत्रित राहून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचले पाहिजे. त्याचबरोबर देशाचा पंतप्रधान तुमच्या सोबत नाही मात्र आम्ही कायम जनतेसोबत राहणार असा विश्वास ही व्यक्त केला.
मोदींना सेल्फ पब्लिसिटी जमते
कश्मीर, नक्षल क्षेत्रात हल्ले होतात. त्यावेळेस कधी मोदींना संसदेत श्रद्धांजली वाहताना काेणी पाहिले आहे का. मात्र केव्हाही मोदीजी विमानात बसून टाटा करताना दिसतात. ते कोणाला टाटा करतात हेच दिसून येत नाही. मोदींना सेल्फ पब्लिसिटी तेवढंच जमतं. हल्ल्यासारखी गंभीर बाब होत असेल तर त्याचा खुलासा आम्हांला पाहिजे असेही आमदार शिंदेंनी नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सत्तेसाठी माेदी काेणतेही कांड करतील
मोदीजी सत्ता मिळवण्यासाठी काही पण करतील, कोणतेही कांड करतील अशी टीका आमदार शिंदेंनी केली. त्या म्हणाल्या देशात सध्या अराजकता फक्त एका माणसामुळे निर्माण होताना दिसत आहे.
मला त्या गोष्टीची भीती वाटत आहे की, हा देश कोणत्या दिशेने चालला असेल. भारतात कधीही जात-पात बघून मतदान झाले नाही. मोदीजी मात्र हे करण्यासाठी लोकांना मजबूर करत असतील. त्यासाठी मोदीजी कांड किंवा षडयंत्र करत असतील. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे असेही आमदार शिंदेंनी नमूद केले.
निवडणुकीच्या तोंडावर सगळं सुचतय
निवडणुकीच्या तोंडावर लोकांना महागाईची झळ, बेकारीची झळ पोहचत आहे. जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचे एक प्रतीक होते. त्यावर मोदी काही बोलत नाहीत मात्र त्यांना निवडणुकीच्या तोंडावरच धर्म जात पात सुचते. निवडणुकीत त्यांना दुसरे काही तंत्र राहिली नाही. त्यामुळे पोलरायझेशन करत आहेत. त्यामुळे लोकशाहीला आग लावण्याचे काम हाेत असल्याचा दावा आमदार शिंदेंनी केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.