Shiv Sena Bjp Alliance : शिवसेना-भाजप युती का फुटली?; शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी केला मोठा गौप्यस्फोट, एकाच नेत्यावर फोडलं खापर (पाहा व्हिडिओ)

Ram Mandir Invitation : हा कार्यक्रम समितीचा आहे, आमचा नाही असेही दीपक केसरकर यांनी नमूद केले.
deepak kesrkar criticizes sanjay raut on ram mandir invitation issue
deepak kesrkar criticizes sanjay raut on ram mandir invitation issue saam tv
Published On

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

राम मंदिर व्हावे (Ayodhya Ram Mandir) यासाठीचे सर्वांत माेठे याेगदान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचे आहे हे सर्वश्रुत आहे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे मला एक दिवसासाठी पंतप्रधान करा मी राम मंदिर (ram mandir) बांधून दाखवेन आणि 370 कलम हटवून दाखवेन. हेच पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm modi) यांनी पूर्ण केले आहे. खरं तर संजय राऊत (sanjay raut) यांनी मोदींचे कौतुक केले पाहिजे परंतु त्यांच्या पाेटात नेमके का दुखत आहे हेच समजेना असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. राम मंदिरच्या उद्घाटनाला शिवसेनेला (shivsena) निमंत्रण देणार नसल्याचा आराेप संजय राऊतांनी केला हाेता. त्यासवर केसरकर यांनी त्यांचे सिंधुदुर्ग (sindhudurg) येथे मत व्यक्त केले. (Maharashtra News)

संजय राऊतांमुळे सेना भाजपात फुट

केसरकर म्हणाले शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार ही बातमी संजय राऊत यांनी (लीक) पसरवली. त्यावेळी गप्प राहिले असते तर युतीमध्ये फूट पडली नसती. मंत्री केसरकर यांनी एक प्रकारे शिवसेना-भाजप युती संजय राऊत यांच्यामुळे फुटल्याचा दावा आज सिंधूदुर्ग येथे केला आहे.

deepak kesrkar criticizes sanjay raut on ram mandir invitation issue
Uday Samant: दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टाेला

दरम्यान राम मंदिर शुभारंभाचा सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आमंत्रण दिले गेले आहे. त्यांना देखील दुसऱ्या टप्प्यात दिले जाईल असेही केसरकरांनी नमूद केले.

हा कार्यक्रम समितीचा आहे, आमचा नाही. भाजपा आणि शिवसेना युती ज्यांच्यामुळे तुटली त्यांना असल्या विषयांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टिप्पणी देखील संजय राऊतांवर केसरकरांनी केली.

रक्ताच्या नात्यातील वंशजांना कुणबी दाखले मिळणार ?

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल. त्यासाठी महाराष्ट्र सरकार बांदील आहे. जातीच्या आरक्षण बाबत घेतलेला कुठलाही निर्णय कोर्टात टिकला पाहिजे. जे कुणबी आहेत. त्यासोबत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील वंशजांना आरक्षण देण्याची व्यवस्था शासनाने केलेली आहे. ह्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे असे मंत्री केसरकर यांनी मनाेज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या कुणबी दाखल्या बाबतच्या मागणीवर नमूद केले.

संजय राऊतांनी असं वागू नये

केसरकर पुढे बाेलताना म्हणाले संजय राऊत यांच्या वागण्यामुळेच आमदार बाहेर पडले. याला जबाबदार सर्वस्वी संजय राऊत आहेत. उद्धव ठाकरेचं (uddhav thackeray) म्हणणं हिंदुत्वा बरोबरच जाण्याच होते, मात्र त्यांची दिशाभूल करण्याचे काम संजय राऊत यांंनी केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरे पुन्हा युतीत यायला तयार होते. महाराष्ट्रात काहीही चांगले होऊ दे. संजय राऊत यांच्या पोटात का दुखते. त्यांनी असं वागु नये, त्यांना कळकळीची विनंती आहे असेही केसरकरांनी म्हटले.

Edited By: Siddharth Latkar

deepak kesrkar criticizes sanjay raut on ram mandir invitation issue
Kolhapur: कार्यकर्ते जिवापाड राबले, हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी केलं; मुश्रीफांनी सांगितलं 'बिद्री'च्या यशाचे गमक (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com