- रणजीत माजगावकर
बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Dudhganga Vedganga Sahakari Sakhar Karkhana Election Result) के.पी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगला कारभार सुरू असल्याने यंदाही सभासदांनी त्यांना स्वीकारले आहे. यापुढच्या काळात सुद्धा चांगला कारभार होईल असे मत काेल्हापूरचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ (hasan mushriff) यांनी नमूद केले. 'बिद्री' कारखान्यावर पुन्हा सत्ताधा-यांनी सर्व 25 जागांवर विजय मिळविल्यानंतर मुश्रीफ यांनी कार्यकर्ते, सभासदांचे आभार मानले. (Maharashtra News)
हसन मुश्रीफ म्हणाले बिद्रीने सभासदांना आत्तापर्यंत विक्रमी दर दिलेला आहे. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी अतिशय ऐतिहासिक निकाल दिला. हा प्रचंड विजय मिळवून दिल्याबद्दल या साखर कारखान्याचे सर्व शेतकरी सभासद, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.
मुश्रीफ पुढे म्हणाले या निवडणुकीत सर्वच कार्यकर्ते अत्यंत जिवापाड राबले. त्यांनी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केलं. उमेदवारी अर्ज भरूनही ज्यांना नाईलाजास्तव माघार घ्यावी लागली त्या सर्व उमेदवारांचेही मनःपूर्वक आभार. या सर्वांचा हा सांघिक विजय आहे. हा विजय अत्यंत विनियाने स्वीकारत आहोत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
साखर व्यवसायामध्ये आणि साखर कारखानदारीमध्ये पुढील काळात अनेक संकटे आहेत. गेल्या पावसाळ्यात पाऊस कमी पडलेला आहे. त्यामुळे हंगाम कमी काळ चालणार आहे. नोकरांना बसून पगार द्यावा लागणार आहे. साखरेची दरही वाढत नाहीत. अशा अनेक समस्या आहेत. तरीसुद्धा; या समस्यांवर या कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील, ज्यांच्यावर तमाम शेतकऱ्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे ते निश्चितच मार्ग काढतील.
सर्वात जास्तीत- जास्त दर ते दिल्याशिवाय राहणार नाहीत. के. पी. पाटील आणि त्यांचे सर्वच संचालक मंडळ शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि इतर अनेक घटकांच्या अनेक अपेक्षा आहेत, त्या सर्वच अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होतील असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
दरम्यान या पुढील काळातही अतिशय स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख कारभार करून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात. एवढ्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये अनेक स्थित्यंतरे असताना सुद्धा या सगळ्यात शेतकरी सभासदांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो विश्वास आपल्याला खोटा ठरवायचा नाही. तो विश्वास सार्थ करून दाखवायचा आहे. त्यासाठी आपण सर्वजण आजपासून आतापासूनच कामाला लागू या असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.