Tuljabhavani Mandir : तुळजाभवानीचा सोन्याचा मुकुट गायब, दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात तफावत; सीआयडी चौकशीची मागणी

देवीच्या नित्योपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सोन्या चांदीचे दागिने,हिरे,मोती असे अनेक अलंकार गायब असल्याचा प्रकार समोर आला आहे.
tulja bhavani of tuljapur
tulja bhavani of tuljapursaam tv
Published On

- बालाजी सुरवसे

Tuljapur News :

तुळजाभवानी मंदिर संस्थानने (tuljabhavani mandir sansthan bhakt) कुणालाही पाठिशी न घालता सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी दागिन्यांची तपासणीसाठी नेमलेल्या मोजदाद समितीचे सदस्य तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम (amarraje kadam) यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली आहे. (Maharashtra News)

तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट व इतर काही माैल्यवान दागिने गायब असल्याचा दागिने तपासणी समितीस आढळले. त्याबाबतचा अहवाल समितीने दोन महिन्यांपुर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

tulja bhavani of tuljapur
Mid Day Meal : पोषण आहारावर डल्ला मारणारे तिघे जेरबंद, वर्धा पाेलीसांची धडाकेबाज कामगिरी (पाहा व्हिडिओ)

देवीच्या प्राचीन दागिन्यांची तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांनी 16 सदस्यांची समीती स्थापन करण्यात आली होती. या समीतीने तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या अहवालातून देवीच्या मंदीरातुन वेगवेगळ्या सात डब्यामधील शेकडो वर्षाचा इतिहास असलेले दुर्मिळ आणि मौल्यवान दागिने गायब असल्याचे समोर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा अहवाल देऊन ही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मंदिर संस्थानने कोणालाही पाठीशी न घालता सीआयडी मार्फत चौकशी करावी व कारवाई करावी अशी मागणी मोजदाद समीतीचे सदस्य तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.

Edited By : Siddharth Latkar

tulja bhavani of tuljapur
Ujani Dam News: प्रतीक्षा संपली! सोलापूरकरांना उजनीचे पाणी मिळणार, शेतीसाठी...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com