Independence Day 2023: Saamtv
महाराष्ट्र

Independence Day: स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची होणार कारागृहातून सुटका, केंद्रीय गृह सचिवालयाचे निर्देश

Independence Day 2023: राज्यातील १८६ कैद्यांना स्वातंत्र्यदिनी मंगळवारी (ता. १५) कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Independence Day 2023: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कारागृहात चांगली वर्तणूक आणि निकषानुसार पात्र असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १८६ कैद्यांना स्वातंत्र्यदिनी मंगळवारी (ता. १५) कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कारागृहात चांगली वर्तणूक आणि निकषानुसार पात्र असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील १८६ कैद्यांना उद्या कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.

या कैद्यांची पात्रता तपासण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने एकूण तीन टप्प्यांत ५८१ कैद्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या प्रस्तावास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ कैदी, दुसऱ्या टप्प्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैदी कारागृहातून मुक्त करण्यात आले आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात येत्या १५ ऑगस्ट रोजी १८६ कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.

‘कैद्यांमध्ये शिस्त आणि त्यांच्या आचरणात सधारणा व्हावी, हा माफी योजनेचा उद्देश आहे. कारागृहातून सुटका होणाऱ्या कैद्यांनी गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक व्हावे,’’ असे आवाहन राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येनंतर श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण तापले

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT