Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

Shruti Vilas Kadam

पावसाळ्याचा मनसोक्त आनंद

मराठी अभिनेत्री पूजा सावंतने पावसाळ्यातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पावसाच्या सरींमध्ये भिजताना आणि निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे.

Pooja Sawant

काळ्या टॉपमधील कूल लूक

या फोटोशूटसाठी पूजाने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि प्रिंटेड बॉटम असा स्टायलिश लूक केला आहे. तिचा हा कूल अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Pooja Sawant

कॉफीचा मग अन् पावसाचा आनंद

एका फोटोमध्ये पूजा हातात कॉफीचा मग घेऊन डोळे मिटून पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. तिचा हा साधा आणि प्रसन्न अंदाज चाहत्यांना आवडला आहे.

Pooja Sawant

निसर्गाच्या सान्निध्यात अभिनेत्री

पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणात पूजा अगदी बिनधास्त अंदाजात दिसत आहे. तिच्या फोटोंमधून पावसाळ्याचा निवांत मूड पाहायला मिळतो.

Pooja Sawant

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

पूजाचे हे पावसाळी फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या लूकची आणि नैसर्गिक सौंदर्याची चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांनी फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

Pooja Sawant

पूजाची खास कॅप्शन

या फोटोंसोबत पूजाने ‘Mandatory favourite season post’ अशी मजेशीर कॅप्शन लिहिली आहे. तिच्या या कॅप्शनमधून पावसाळा हा तिचा आवडता ऋतू असल्याचे दिसते.

Pooja Sawant

चाहत्यांकडून कौतुक

पूजा सावंत सोशल मीडियावर सक्रिय असून ती वेळोवेळी तिचे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या या नव्या पावसाळी लूकचेही चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Pooja Sawant

Mousse Cake Recipe: घरच्या घरी बनवा क्रीमी आणि चॉकलेटी मूस केक; बेकिंगशिवाय तयार होईल स्वादिष्ट डेझर्ट

Mousse Cake Recipe | saam tv
येथे क्लिक करा