Shruti Vilas Kadam
मूस केकसाठी चॉकलेट, फ्रेश क्रीम, बिस्किटे, बटर, पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेन्स घ्या. सजावटीसाठी चॉकलेट शेव्हिंग्स, कोको पावडर किंवा ताजी फळे वापरू शकता.
बिस्किटांचा बारीक चुरा करून त्यात वितळलेले बटर मिसळा. हे मिश्रण केक टिनच्या तळाशी व्यवस्थित दाबून पसरवा. साधारण १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
डार्क किंवा मिल्क चॉकलेटचे छोटे तुकडे करा. डबल बॉयलरच्या मदतीने चॉकलेट हळूहळू वितळवा. चॉकलेट पूर्णपणे गुळगुळीत झाल्यानंतर थोडे थंड होऊ द्या.
एका थंड भांड्यात फ्रेश क्रीम आणि पिठीसाखर घेऊन इलेक्ट्रिक बीटरने फेटा. क्रीम हलकी आणि फ्लफी होईपर्यंत व्हिप करा. जास्त फेटू नका.
वितळलेले चॉकलेट थंड झाल्यानंतर ते फेटलेल्या क्रीममध्ये हळूहळू मिसळा. व्हॅनिला इसेन्स घालून स्पॅटुलाच्या मदतीने हलक्या हाताने मिक्स करा, जेणेकरून क्रीमची फ्लफी टेक्स्चर टिकून राहील.
तयार चॉकलेट मूस बिस्किटाच्या बेसवर ओता आणि वरचा भाग व्यवस्थित समतल करा. केक कमीत कमी ४ ते ६ तास किंवा मूस पूर्णपणे सेट होईपर्यंत फ्रिजमध्ये ठेवा.
मूस केक सेट झाल्यानंतर त्यावर कोको पावडर, चॉकलेट शेव्हिंग्स किंवा बेरीज घालून सजवा. थंडगार सर्व्ह केल्यास क्रीमी आणि चॉकलेटी मूस केक अधिक स्वादिष्ट लागतो.