पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Kolhapur Poultry Farm Used for MD Drug Production: कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेला एमडी ड्रग्स निर्मितीचा गुप्त कारखाना अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने उद्ध्वस्त केला. कारवाईत 1.13 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
KOLHAPUR MD DRUGS FACTORY BUSTED
KOLHAPUR MD DRUGS FACTORY BUSTEDsaam tv
Published On

राज्याच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी कारवाई करत चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेला एमडी ड्रग्स निर्मितीचा गुप्त कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 ते 6 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. मीरा रोड मधील नया नगर पोलिस ठाण्यात २ करोड रुपये किंमतीचे ड्रग्स तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना यातील इरफान खान या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोल्हापूरमध्ये पप्पू मालवडर याच्या मालकीच्या असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये अमली पदार्थांचे उत्पादन सुरू केलं होतं.

KOLHAPUR MD DRUGS FACTORY BUSTED
ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांच्या कारवाईत तब्बल ९ लाखांचा MD जप्त

तपासादरम्यान इरफान खानकडे चौकशी करण्यात आली असता त्याने कोल्हापूर जिल्हयातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे पप्पू मालवडकर यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्ममध्ये अमली पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पथकाने पोल्ट्री फार्मवर छापा टाकला. कारवाईदरम्यान घटनास्थळी सुरू असलेला क्लँडेस्टाईन अर्थात गुप्त ड्रग्स कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. पोल्ट्री फार्ममधून सुमारे 208 ग्रॅम तयार एमडी ड्रग्स, 70 लिटर मोनोमिथाईल अमाईन, 2-ब्रोमो केमिकल पावडर तसेच ड्रग्स निर्मितीसाठी वापरले जाणारे प्रयोगशाळेचे साहित्य असा एकूण 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

KOLHAPUR MD DRUGS FACTORY BUSTED
Crime News: पुण्यातील फेमस रीलस्टारला अटक; ५ हजारांहून अधिक बँक खात्यांतून १० कोटींचं मनी ट्रेल, हाँगकाँग कनेक्शन उघड

या प्रकरणात आतापर्यंत 5 ते 6 जणांना अटक करण्यात आली असून, या ड्रग्स रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या कारखान्यातून तयार होणारे अमली पदार्थ कुठे आणि कोणाला पुरवले जात होते, याचा तपास अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com