Prakash Surve News: शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंवर व्यवसायिकाचा गंभीर आरोप; खंडणी प्रकरणातला VIDEO व्हायरल

Political News: पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोपही साहेबराव पवार यांनी केला आहे.
Prakash Surve News
Prakash Surve NewsSaam TV
Published On

संजय गडदे

Maharashtra Political News: शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. व्यवसायिकाच्या अपहरण प्रकरणी प्रकाश सुर्वे यांच्या मुलाचे नाव आल्यानंतर आता दहिसर येथील एका जीवघेण्या खदानीच्या भरणीचे काम करणाऱ्या व्यावसायिकाने आमदार प्रकाश सुर्वे आणि शाखाप्रमुख सुनील मांडवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Latest Marathi News)

खदानीचे भरणी काम करण्यासाठी आमदार सुर्वे यांच्या सांगण्यावरून शाखाप्रमुख सुनील मांडवे यांनी व्यावसायिकाकडे 12 लाख रुपये मागितल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी व्यावसायिक साहेबराव बारकू पवार याने दहिसर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. मात्र पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोपही साहेबराव पवार यांनी केला आहे.

Prakash Surve News
Maharashtra Politics: शरद पवार यांच्या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये संभ्रम; काका-पुतण्याच्या भेटीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गटात खलबतं

दहिसर पूर्वेकडील काजुबाडा परिसरातील धोकादायक खदान बुजवण्यासाठी साहेबराव पवार यांनी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या महापालिका, पोलीस ठाणे आणि फॉरेस्ट विभागाकडून घेऊन कामास सुरुवात केली. मात्र, हे काम आमदार प्रकाश सुर्वे हे करून देत नसल्याचा आरोप व्यावसायिक साहेबराव पवार यांनी केला आहे.

आमदार प्रकाश सुर्वे यांनी हे काम करायचे असल्यास 12 लाख रुपये द्यावे लागतील, दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी ६ लाख असे १२ लाख रुपये दिले तरच काम करून देऊ असे आमदार सूर्वेंनी म्हटले असल्याचे साहेबराव पवार यांनी म्हटले आहे.

Prakash Surve News
Saamana Editorial: महाराष्ट्र म्हणजे 'गंमत जंमत' नाही; शरद पवार - अजित पवार भेटीवरुन सामनातून टीकास्त्र; CM शिंदेंवरही निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com