चाकण परिसरातील रस्ते, पाणी, वीज आणि ड्रेनेज समस्यांवर मात करण्यासाठी प्रशासनाची व्यापक योजना.
खड्डेमुक्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर:
पावसाळ्यात तात्काळ रस्ते दुरुस्तीसाठी जिओपॉलिमर टेक्नोपॅच आणि प्रीकास्ट काँक्रीट पॅनेलचा यशस्वी वापर; ठाणे-नाशिक महामार्गाच्या धर्तीवर चाकणमध्ये प्रयोग.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २ उच्चस्तरीय समित्या:
PMRDA, MIDC, PWD, NHAI या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी समिती गठीत.
चाकणला मेट्रोने जोडणार:
नाशिक फाटा–चाकण–राजगुरूनगर आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावर मेट्रोच्या व्यवहार्यता तपासणी व डीपीआर तयार करण्याचे महामेट्रोला निर्देश.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग व सायकल ट्रॅक:
अंतर्गत रस्ते रुंदीकरण, पदपथ, सायकल ट्रॅक तसेच PMRDA च्या पर्यायी रस्त्यांच्या कामाला गती.
कचरा व पाणी समस्येवर तातडीचे उपाय: कचरा प्रक्रियेसाठी नवीन जागा व यंत्रणा; पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात पाणीपुरवठामंत्र्यांचा दौरा.
उद्योगांचे स्थलांतर होणार नाही:
प्रशासनाच्या तत्पर निर्णयांमुळे उद्योजक समाधानी;
एकही उद्योग चाकणबाहेर जाणार नसल्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन: बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, जबरदस्तीने भूसंपादन होणार नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईतील मोकळी मैदाने वाचवूया हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलू नये यासाठी आज आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तिरंगा आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला
बीडच्या परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात मोठी गर्दी होत आहे.विशेषतः शनिवार रविवार या सलग सुट्ट्या याबरोबरच एकादशी व श्रावण सोमवार यानिमित्त आता परळीत लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत.भाविकांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन मंदिर संस्थांच्या वतीने पायऱ्यावर असलेल्या बॅरिकेटिंग मधून आता दर्शन रांग सुरू करण्यात आली आहे. आज रविवारी मोठी गर्दी असल्याने यापेक्षाही जास्त उद्या सोमवारी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चाकणमधील पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि नीलम गोऱ्हे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.
श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील इंदिरानगर परिसरात रामसेनेकडून भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. इंदिरानगर नाक्यापासून कौपिनेश्वर मंदिरापर्यंत ही कावड यात्रा काढण्यात आली. यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. यावेळी आमदार संजय केळकर, नगरसेवक अमित सरय्या, नगरसेवक सुरेश कांबळे यांच्यासह रामसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. श्रावणातील धार्मिक वातावरणात भक्तांनी उत्साहात सहभाग घेत भगवान शंकराचा जयघोष केला. यात्रेदरम्यान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चाकण पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून शिंदेंच्या दौऱ्याची सुरुवात झाली असून, त्यानंतर चाकणमधील पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी केली जाणार आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याण पूर्वेतील नामांकित भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
कोल्हापूरामध्ये MIDCमध्ये आग लागली आहे.
तब्बल वीस दिवसाच्या खंडा नंतर नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन झालेलं आहे. नांदेड शहरसह, नांदेड जिल्ह्यातील हदगाव,अर्धापूर तालुक्यातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या.
सातपुड्यातील प्रसिद्ध धबधबा असलेल्या वाल्हेरी गावाजवळील नदीपात्रात मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेल्या 12 वर्षीय अविनाश पाडवी या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.नदीत अंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने अविनाश अचानक खोल पाण्यात बुडाला.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री दर्जा प्राप्त कॅप्टन आशिष आनंद दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहादा शहरातील मीरा प्रताप लॉन्सवर भगवान परशुराम समाज संवाद यात्रा कार्यक्रम उत्साहात पार पडला.सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
- सोलापुरातील विडी उद्योजकांचा महाराष्ट्र सोडून तेलंगणात जाण्याचा ईशारा
- राज्य सरकारने विडी कामगारांचे वेतन वाढवण्याचा आदेश काढल्यानंतर विडी कारखानदार संतप्त
- सरकारने वेतनवाढीचा हा आदेश रद्द न केल्यास आम्ही शेजारील तेलंगणा राज्यात जाणार
चार निष्पाप बालकांच्या क्रूत्या व एका मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे सहा वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा तपास तात्कालीन परिविक्षाधिन अधिकारी असताना पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केला होता.
चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूककोंडी, खड्डेमय रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज चाकणमधील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला.
परभणीत नर्सिंगची परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वितरित झाल्यानंतर काही वेळातच तिचा मोबाइलमधून फोटो काढून तो व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाच जणाविरुद्ध नाना पेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र निरीक्षकांच्या तपासणीत हा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेतील प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूककोंडी, खड्डेमय रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज चाकणमधील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला.
पुणे विमानतळ रस्त्यावर भीषण अपघात
शनिवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये दोन वाहनांचा चुराडा
पुणे विमानतळ रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक
अपघातात दोन जणं जखमी झाल्याची माहिती
अपघात इतका भयंकर होता की वाहनांचे समोरील भागाचे पूर्णपणे नुकसान झालं आहे
नांदेड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री देण्याची मागणी
पालकमंत्री बदलण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची जल संधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे मागणी
क्लांडस्टाईन कारखान्यावर राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ची कारवाई
कोल्हापूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्म वर सुरू होता एम डी बनवण्याचा कारखाना
एम डी हे ड्रग्स बनवण्यासाठी लागलेल्या रसायन केले जप्त
१ ते २ करोड रुपये किमतीचे रसायन केले जप्त तर ६ जणांना याप्रकरणी केली अटक
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधव यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लामजना पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, प्रलंबित पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित द्यावी यासह इतर मागण्यासाठी शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.
- भर रस्त्यात मोकाट जनावरांचा मुक्तसंचार; वाहनचालक त्रस्त
- दळणवळणाच्या प्रमुख रस्त्यांवर जनावरांचा ठिय्या
- अचानक समोर जनावरे आल्याने वाहनचालकांची उडते तारांबळ
- वेगाने येणाऱ्या वाहनांसमोर जनावरे आल्याने अपघाताचा धोका
- रात्रीच्या वेळी मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांना अधिक धोका
- जनावरांना वाचविताना वाहनचालकांना अचानक ब्रेक लावण्याची वेळ
शेतकऱ्यांकडून महामार्गावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू
आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन रस्ता रोखण्यात आला
वाहनांच्या लांबच लांब रांगा
अक्कलकोट रोडवर ओला चार्जिंग गाडीला अचानक आग ; मल्लिकार्जुन नगर परिसरात गाडी जळून खाक
बॅटरीतील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात आज ओला कंपनीच्या चार्जिंग गाडीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.
गाडीमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीच्या मोठ्या ज्वाळा भडकल्या.पाहता पाहता संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तळेगाव-चाकण मार्गावर नव्या तंत्रज्ञानाने रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकण दौऱ्यावर येत आहेत.
नीरा उजवा कालवा फटा क्रमांक पाचला नियमित पाणी सोडावे, या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील 18 गावातील शेतकऱ्यांनी 15 ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या भागातील शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळत नसल्याने शेतीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे वारंवार मागणी करून ही पाणी मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी 15 ऑगस्ट पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
- आशियाना अंजुम सय्यद, अल्ताफ असे बाळ अपहरण करणाऱ्या महिलेचे नाव.
- या महिलेने प्रभा पाठराभे यांची एक दिवसाची नवजात बालिका पळवली होती.
- पोलिसांनी शोध मोहीम राबवून काही तासात महिलेच्या ताब्यातून बाळाची सुटका केली होती.
- पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच आशियाना अल्ताफ हिने ऑटोतून उडी घेतली. त्यामुळे ती जखमी झाली. तिच्यावर मेयोत उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले..
- तहसील पोलिस ठाण्यात सदरील महिलेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा करत तिला अटक केली.
ऐन सणासुदीच्या तोंडावर बाजारात साखरेचा कडवटपणा वाढला आहे. चंद्रपूरच्या बाजारपेठेत साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाली असून, दर थेट ७२ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. चंद्रपूर शहरात साखरेच्या भावात झालेली ही दरवाढ सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी दोघांचीही झोप उडवणारी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी ४० ते ५० रुपये प्रति किलो मिळणारी साखर आता थेट ७२ रुपये किलो विकली जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, बाजारातील ही परिस्थिती एखाद्या शेअर बाजारासारखी झाली आहे—सकाळी एक दर तर दुपारी दुसराच दर पाहायला मिळत आहे. या अचानक झालेल्या २० ते २५ रुपयांच्या दरवाढीमुळे ग्राहक तर संतप्त आहेतच, पण दुकानदारही ग्राहकांशी व्यवहार करताना संभ्रमात पडले आहेत.
संततधार पावसामुळे शेतात भाजीपाला सडत असतानाच बाजारात आणलेल्या पालेभाज्यांनाही कवडीमोल दर मिळत आहे. चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर, मेथीसह पालेभाज्यांना अवघा १ ते २ रुपये दर मिळत असल्याने शेतकरी आणि व्यापारी हतबल झाले आहेत.
बीडमध्ये भटक्या कुत्र्याची दोन वर्षांच्या चिमुकलीवर अक्षरशः जीवघेणी झडप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. शिवतेज नगरमधील रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या शिवांशी रामेश्वर घोलप या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः चावा घेत लचके तोडले.
परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव तांडा येथे घरासमोर बसलेल्या कुटुंबावर गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या गोळीबारात ८५ वर्षीय वृद्ध जखमी झाले असून घराच्या दरवाजाचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी ३१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी दिली.
मासेमारी नौका भरकटून रत्नागिरी शहरानजीकच्या कुर्ली समुद्रकिनारी धडकल्याची घटना घडली आहे. समुद्रातील खवळलेलं वातावरण आणि तांत्रिक बिघाडामुळे अल रिझवान नावाची नौका अचानक अनियंत्रित झाली. ऐनवेळी इंजिन निकामी झाल्याने आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने नौका थेट किनाऱ्याच्या दिशेने भरकटत गेली. सुदैवाने ही नौका वेळेत कुर्ली किनाऱ्याला लागल्याने अनर्थ टळला. यातील 7 ही खलाशी सुखरूप आहेत. किनाऱ्याला आदळल्यामुळे बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी प्रसंगावधानामुळे बोटीवरील सर्व सातही खलाशी पूर्णपणे सुखरूप आहेत.
हिंगोली मध्ये कावड यात्रेत डीजेचा मोठा आवाज करून वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीत डीजेची धडक लागल्याने शिवभक्ताचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे, धक्कादायक बाब म्हणजे अपघात होऊन देखील डीजेच्या जास्त आवाजामुळे हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही
शेतात विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका तरूण शेतकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही घटना आज सकाळी पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे घडली. गणेश शेंडगे (वय 25) असं या मरण पावलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
गणेश शेंडगे हे आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करत असताना विजेचा धक्का बसला यातच त्यांचा मृत्यू झाला.
भोर तालुक्यातील प्रस्तावित भोंगवली सबस्टेशन आणि ७६५ केव्ही टॉवर लाईनविरोधात आज पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. बाधित ग्रामस्थ ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि जनावरे घेऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. या प्रकल्पामुळे भोरमधील ७१ आणि राजगड तालुक्यातील ४५, अशी ११६ गावे बाधित होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मावळ आणि मुळशी तालुक्यातील दहा गावांना सिंचन व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे कासारसाई धरण ९९ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धाारणाच्या सांडव्यावारू ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर आणि पाण्याची आवक वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी किंवा वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीपात्रातील जनावरे आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी.
भोर तालुक्यातील प्रस्तावित भोंगवली सबस्टेशन आणि ७६५ केव्ही टॉवर लाईनविरोधात आज पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. बाधित ग्रामस्थ ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि जनावरे घेऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. या प्रकल्पामुळे भोरमधील ७१ आणि राजगड तालुक्यातील ४५, अशी ११६ गावे बाधित होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सावंतवाडीच्या मोती तलावात कारिवडे येथील दहावीत शिकणाऱ्या लिसा गोसावी हिने मोती तलावात उडी घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी तिचा नातेवाईक रोहन गोसावी (नाधवडे, वैभववाडी) यानेही पाण्यात उडी घेतली... मात्र, या दुर्दैवी घटनेत लिसा आणि रोहन या दोघांचाही बुडून मृत्यू झाला...मात्र या घटनेला आता नवं वळण मिळालं आहे... मोती तलावात उडी मारण्यापूर्वी लिसा गोसावी, रोहन गोसावी आणि त्यांच्यासोबत असलेली लीसा हीची मैत्रीण यांच्यात झालेल्या वादाचा सीसीटीव्ही व्हिडिओ हाती आला आहे...या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय घडलं? तिघांमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला? आणि त्यानंतर लिसा गोसावी हिने तलावात उडी का घेतली? या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. लिसा गोसावीने टोकाचं पाऊल का उचललं, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजसह या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सुरू आहे..
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शिरड गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांना प्यायला मिळणाऱ्या पाण्याच्या जलकुंभात मृत पक्ष्याचे अवशेष आढळून आले आहेत.दूषित पाण्यामुळे संपूर्ण गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.शिरड येथील पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलकुंभाची साफसफाई गेल्या अनेक महिन्यांपासून झालेली नाही.ग्रामस्थांनी पाण्यासाठी नळ सुरू करताच दुर्गंधीयुक्त पाणी येऊ लागले. संशय आल्याने ग्रामस्थांनी थेट जलकुंभावर जाऊन पाहणी केली असता, आतमध्ये मृत पक्ष्याचे कुजलेले अवशेष तरंगताना आढळले.हेच दूषित पाणी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण गावाला पुरवठा केला जात होता. हे पाणी प्यायल्याने अनेकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पुणे शहरात आढळून आले ९२० संशयित रुग्ण
पुण्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला आहे
९२० हून अधिक डेंग्यू संशयित रुग्ण आढळले आहेत
३९ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत तर चिकुनगुनियाचे १४ रुग्ण आढळले आहेत
महापालिकेच्या सर्वेक्षणात डासांची उत्पत्ती होणारी १ हजार ७०८ ठिकाणे आढळली विशेषतः जून-जुलैमध्ये डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये झालेली वाढ चिंताजनक ठरत आहे
- वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि ‘महाराष्ट्र केसरी’ किताब लढत २०२६-२७ मध्ये नागपुरात होणार आहे.
- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त आयोजनाला मंजुरी.
- सहसंयोजक व मनपा सत्ता पक्षनेते नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांच्या मागणीनुसार स्पर्धेच्या आयोजनास परवानगी देण्यात आली.
- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस आणि सरचिटणीस योगेश दोडके यांनी आयोजनास परवानगी जाहीर केली.
अमरावती जिल्ह्यात जन्म-मृत्यू दाखला काढणाऱ्या नागरिकांच्या खिशाला आता चाट बसणार आहे. राज्य शासनाने जन्म-मृत्यू दाखल्याच्या शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत ३१ जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत १० रुपयांत मिळणाऱ्या दाखल्यासाठी आता २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नदी-नाले कोरडे पडले आहेत, तर अनेक भागांत शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यांना सुरुवातीपासूनच लातूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालाय, दरम्यान समाधानकारक पाऊस नझाल्याने
मांजरा नदीचे पात्रही अनेक ठिकाणी कोरडे पडल्याचे चित्र आहे
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम अरबी समुद्रावरही जाणवत असून, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाली आहे.त्या मच्छीमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छिमारीला ब्रेक लागलाय.सुमारे २०० मच्छीमारी नौकांनी जयगड, रत्नागिरी, हर्णे आणि देवगड बंदरांचा आश्रय घेतला असून, जयगडमध्ये सर्वाधिक १०० नौका नांगरण्यात आल्या आहेत. समुद्र खवळल्याने मोठ्या लाटा आणि जोरदार करंट निर्माण झाला आहे.हवामान सुधारत नाही तोपर्यंत नौका समुद्रात न उतरवण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. पर्ससीन नेट मासेमारीला सुरुवात होऊन अवघे चार दिवस झाले असतानाच खराब हवामानामुळे मासेमारी हंगामाला ब्रेक लागला आहे.
चार निष्पाप बालकांच्या क्रू हत्या व एका मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे सहा वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा तपास तात्कालीन परिविक्षाधिन अधिकारी असताना पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केला होता.या गंभीर प्रकरणातील सूक्ष्म, वैज्ञानिक व नि:पक्षपाती तपासामुळे आरोपीला फाशीची शिक्षा झाली. या ऐतिहासिक दोषसिद्धीची विशेष दखल घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचा उत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्काराने गौरव करण्यात आला.
चाकण औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनाकडून विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकण दौऱ्यावर येणार आहेत.
चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते, वाहतूककोंडी, कचरा आणि पाण्याच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी विविध विभागांकडून कामं सुरू करण्यात आली आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कामांचा आढावा घेण्यात आला होता. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाइन उपस्थित होते आणि त्यांनी संबंधित विभागांना कामं तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली असून, सध्या सुरू असलेल्या या कामांची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे आज चाकणमध्ये येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात कामांचा वेग आणि गुणवत्तेबाबत काय आढावा घेतला जातो, याकडे लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.