Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागल्याने कार पलटी, कारचा अक्षरश: चक्काचूर

Buldhana Samruddhi Highway Accident : सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Accident News
Accident News Saam TV
Published On

Buldhana News : समृद्धी महामार्गावर अपघातांचा मालिका सुरुच आहे. महामार्ग सुरु झाल्यापासून इथे झालेल्या अपघातांमध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजही महामार्गावर अपघात झाला आहे, मात्र सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

समृद्धी महामार्गावर झोपेची डुलकी लागून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. दुसरबीड ते मलकापूर पांग्रानजीक मुंबई कॉरिडोर चॅनल नंबर ३०६.३ या ठिकाणी अपघात झाला आहे. चालकाला डुलकी लागल्याने कार पलटी होऊन हा  अपघात झाला.

Accident News
Ahmednagar Accident: सहलीहून परतताना मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला आहे. पार्थ हरपाल वय ३४ वर्ष राहणार राजकोट असं जखमी कारचालकाचे नाव आहे. ही कार वाशीमहून मुंबईच्या दिशेने जात होती. (Latest Marathi News)

Accident News
Gadchiroli News: आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले अन् अनर्थ घडला; गोदावरीत बुडून दोघांचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमी कार चालकास तात्काळ सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूकही संथ झाली होती. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com