Indapur Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Indapur Accident: विठुरायाचं दर्शन झालं पण वाटेत मृत्यूनं गाठलं, वारकऱ्याचा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू

Indapur Tempo Accident: इंदापूरमध्ये वारकऱ्यांचा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एका महिला वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले आहेत. या टेम्पोमध्ये असलेली लहान मुलं सुखरूप आहेत.

Priya More

सागर आव्हाड, इंदापूर

इंदापूरमध्ये (Indapur) वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूरवरून (Pandharpur) पतताना वारकऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झालेत. इंदापूरमधील रामवाडी येथे हा अपघात झाला. जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

आषाढी वारीनिमित्त राज्यभरातील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. आता सर्व वारकरी आपआपल्या गावाच्या दिशेने निघाले आहेत. अशामध्ये पंढरपूरवरून आपल्या गावाकडे परत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला इंदापूरजवळ अपघात झाला. इंदापूरच्या रामवाडी येथे वारकऱ्यांचा टेम्पो रस्त्यामध्ये पलटी झाला. या टेम्पोमधून एकून ११ वारकरी प्रवास करत होते.

या अपघातामध्ये एका महिला वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले आहेत. या टेम्पोमध्ये असलेली लहान मुलं सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांना तात्काळ इंदापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताचा तपास इंदापूर पोलिस करत आहेत.

सोलापूरच्या करमाळा येथे राहणाऱ्या सुवर्णा राजेंद्र गुरव यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील असून हे पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर श्री क्षेत्र शिंगणापूर येथे महादेवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना अपघात झाला. इंदापूर तालुक्यात अकलूज रोडवर रामवाडी गावाच्या हद्दीमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर टेम्पो पलटी होऊन हा अपघात झाला आहे.

दरम्यान, जळगावमध्ये भरधाव कारने ५ जणांना चिरडल्याची घटना घडली. जळगावच्या मेहरुण परिसरातील मंगलपुरी गल्लीत हा अपघात झाला. घरासमोर उभं राहून गप्पा मारत असलेल्या ५ महिलांसह २ चिमुकल्यांना कारने धडक दिली. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. या अपघातामध्ये ४ महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

SCROLL FOR NEXT