Indapur News: इतकी हिंमत होते कशी? इंदापूर तहसीलदारांवर हल्ला; भरचौकात गाडी फोडली, मिरची पूड टाकली

Indapur Breaking News: तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी इंदापूर शहरातील संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढवला.
Indapur Breaking News:
Indapur Breaking News: Saamtv

इंदापुर, ता. २४ मे २०२४

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूर शहरातील संविधान चौकात हा प्रकार घडला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी इंदापूर शहरातील संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने जोरदार हल्ला चढवला.

सोबतच या खाल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती, ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये शासकीय गाडीच्या काचा फुटल्या असून सुदैवाने तहसीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुका परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

Indapur Breaking News:
Nana Patole News: 'खोके सरकारने पैसे घेतले, उद्योग सुरू ठेवले', डोंबिवली दुर्घटनेवरुन नाना पटोलेंचे गंभीर आरोप; राज्य सरकारला घेरलं!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com