Nana Patole News: 'खोके सरकारने पैसे घेतले, उद्योग सुरू ठेवले', डोंबिवली दुर्घटनेवरुन नाना पटोलेंचे गंभीर आरोप; राज्य सरकारला घेरलं!

Nana Patole On Dombivli MIDC Blast: खोके सरकारने त्या उद्योगपतींकडून पैसे घेतले, उद्योग सुरू ठेवले आणि काल दुर्दैवी घटना घडली," असे गंभीर आरोप नाना पटोलेंनी केले.
Nana Patole News: 'खोके सरकारने पैसे घेतले, उद्योग सुरू ठेवले', डोंबिवली दुर्घटनेवरुन नाना पटोलेंचे गंभीर आरोप; राज्य सरकारला घेरलं!
Nana Patole NewsSaam tv

पराग ढोबळे, नागपुर|ता. २४ मे २०२४

डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट होऊन ११ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झालेत. स्फोटानंतर आसपासच्या कंपन्यांमध्येही आग लागल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. घटनास्थळी अग्निशमन दल तसेच एनडीआरएफच्या टीमकडून अद्यापही बचावकार्य सुरू असून या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त करत शिंदे- फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केलेत.

काय म्हणाले नाना पटोले?

"काल डोंबिवलीच्या कारखान्यात स्फोट झाला त्यात अनेकांचे जीव गेले. तिथल्या धोकादायक परिस्थितीची माहिती सरकारकडे आली होती. उद्धव ठाकरेंच्या सरकारने ते बंद करण्याची निर्णय घेतले होते. मात्र खोके सरकारने त्या उद्योगपतींकडून पैसे घेतले, उद्योग सुरू ठेवले आणि काल दुर्दैवी घटना घडली," असे गंभीर आरोप नाना पटोलेंनी केले. तसेच राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे. भाजप महाराष्ट्राला बरबाद करत आहे, "असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

"पुण्यातील हिट अँड रन केसमध्ये पोलिसांची चौकशी झालीच पाहिजे. सरकारची चौकशी ही झाली पाहिजे. सरकारचा दबाव होता का? आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सरकारच्या दबावामुळे भीती आहे. त्यामुळे राज्याची कायदा सुव्यवस्था संपली आहे. त्यामुळे फक्त पुणे पोलिसांची चौकशी नको, तर सरकारचे डोकेही तपासले पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित दादांची चौकशी झाली पाहिजे," असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

Nana Patole News: 'खोके सरकारने पैसे घेतले, उद्योग सुरू ठेवले', डोंबिवली दुर्घटनेवरुन नाना पटोलेंचे गंभीर आरोप; राज्य सरकारला घेरलं!
Spain Restaurant Collapses: रेस्टॉरंटचे छत कोसळून मोठी दुर्घटना! ४ जणांचा मृत्यू, २०हून अधिक जखमी; बचावकार्य सुरू

"आचारसंहितेचे कारण सांगून सरकार दुष्काळ निवारण पासून पळवाट काढत आहे. जनता पाण्यासाठी पायपीट करत आहे. जनावरांना चारा नाही, तरी शेतकऱ्यांना न्याय नाही, सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री आढावा घ्यायला गेले आणि त्यांचे मंत्री त्यांना ऐकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या पाणीटंचाई आणि दुष्काळ आढावा बैठकीत मंत्री उपस्थित न राहणे गंभीर आहे. दुष्काळ निवारणाची कामे लवकर सुरू करावी, आचारसंहितेचे कारण सांगू नये," असा टोलाही नाना पटोलेंनी लगावला.

Nana Patole News: 'खोके सरकारने पैसे घेतले, उद्योग सुरू ठेवले', डोंबिवली दुर्घटनेवरुन नाना पटोलेंचे गंभीर आरोप; राज्य सरकारला घेरलं!
Amravati News: ११ तरुणी, ३४ तरुण अन् वॉटर पार्कमध्ये रंगली बेधुंद पार्टी, मध्यरात्री पोलिसांची धाड; ४५ जणांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com