Harshvardhan Patil And Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Indapur Politics: हर्षवर्धन पाटलांविरोधात काँग्रेस आक्रमक, इमारतीच्या वादावरुन थेट शरद पवारांना पत्र; इंदापुरात राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Election 2024: जोपर्यंत काँग्रेस भावनांचा ताबा पुन्हा काँग्रेसकडे येत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केली आहे.

मंगेश कचरे

Indapur Politics News: विधानसभेच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली, तेव्हापासून इंदापुरचे राजकारण चांगलेच तापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधूनच हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रविण माने, आप्पासाहेब जगदाळे यांनी मेळावा घेत बंडखोरीचे संकेत दिले होते. अशातच आता काँग्रेस भवनाच्या इमारतीवरुन हर्षवर्धन पाटील यांना लक्ष करण्यात आले असून याबाबत थेट शरद पवारांना पत्र पाठवले आहे.

इंदापूरच्या काँग्रेस भवनच्या इमारतीवरु आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. इंदापूरच्या काँग्रेस भावनांचा ताबा सध्या हर्षवर्धन पाटलांकडे आहे, जोपर्यंत काँग्रेस भावनांचा ताबा पुन्हा काँग्रेसकडे येत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केली आहे. यासंबंधी आमदार संजय जगताप यांनी शरद पवार यांना पत्रही लिहले आहे.

काँग्रेस पक्षाने इंदापूर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमदार, मंत्रीपदे दिलेली असूनही ज्यावेळी प्रतिष्ठित व्यक्तीने काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळेस इंदापूर काँग्रेस भवन इमारतीचे आतून संपूर्ण मोडतोड करून इमारतीचे नुकसान करूनही इमारतीचा कब्जा सोडला नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे संजय जगताप यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

तसेच राज्यात विधानसभेच्या निवडणुका त्यामध्ये इंदापूर विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतर्फे ही जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जर यांना देण्यात आली, तर या गटामध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस भवनची इमारत व जागा ताब्यात ठेवली आहे, ती जोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देत नाहीत तोपर्यंत त्यांना उमेदवारी देण्याबाबत विचार करू नये. अशी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे, असे आमदार संजय जगताप यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT