Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार; कट्टर शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politcal News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं असून संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कट्टर शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Maharashtra Politcal News
Maharashtra Politcal NewsSaam TV
Published On

छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसहिंता लागण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता राजकीय पक्षाचे नेते नव्या दमाने मैदानात उतरले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले होते. ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गळाला लावले होते. आता विधानसभेआधी शिंदे यांनी पुन्हा ठाकरे गटाचे पदाधिकारी फोडण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra Politcal News
Maratha vs OBC : नाशिकमध्ये मध्यरात्री तुफान राडा, शिवसृष्टीत जरांगे-भुजबळ समर्थक भिडले; पाहा VIDEO

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील ठाकरे गटाचे शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल, माजी नगरसेविका शोभा काळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. धनुष्यबाण हातात घेणारे पदाधिकारी संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील आहेत.

सध्या शिंदे गटाचे संजय शिरसाट हे या मतदारसंघातील आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी सिरसाट यांची ताकद वाढली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडलं असून शिवसेनेतील गटबाजी चर्चेत आली आहे. दरम्यान, मी नेत्यांच्या गटबाजीला कंटाळलो होतो. जिल्हाप्रमुख, नेते, इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या सूचना करत होते, असं विजय वाघचौरे यांनी म्हटलंय.

गटबाजीमुळे मला ठाकरे गटात काम करण्याची संधीच मिळत नव्हती. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असंही वाघचौरे यांनी स्पष्ट केलं आहे. संभाजीनगरपाठोपाठ नागपूरच्या रामटेक विधानसभा मतदारसंघातही शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

पारशीवनी येथील कार्यक्रमात अपक्ष असलेले शिवसेना समर्थक आशिष जयस्वाल यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आशिष जयस्वाल यांनी अधिकृतपणे शिवधनुष्य आणि भगवा ध्वज हातात घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Politcal News
Maharashtra Assembly Election : निवडणूक आचारसंहिता कधी लागणार? वेगवेगळ्या दाव्यांमध्ये उत्सुकता वाढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com