Raj Thackeray: 'राज्य सरकारचं अभिनंदन, पण.., टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंना वेगळीच शंका; पहिली प्रतिक्रिया काय?

Toll waiver decision At Five Toll Entering Mumbai: आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी.
Raj Thackeray: 'राज्य सरकारचं अभिनंदन करेन, पण.., टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंना वेगळीच शंका; पहिली प्रतिक्रिया काय?
Eknath Shinde Vs Raj ThackeraySaam TV
Published On

वैदेही कानेकर, मुंबई

MNS Chief Raj Thackeray On Toll waiver descion: राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच शिंदे सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला. तसेच हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट..

"मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला,"

"आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. पण असो... किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी', असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: 'राज्य सरकारचं अभिनंदन करेन, पण.., टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंना वेगळीच शंका; पहिली प्रतिक्रिया काय?
Maharashtra Politics: 'शरद पवारांनी आकाशतही राज्य केलं असतं, मविआ कौरवांची फौज..', सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र

आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले.

महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.

Raj Thackeray: 'राज्य सरकारचं अभिनंदन करेन, पण.., टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंना वेगळीच शंका; पहिली प्रतिक्रिया काय?
Sanjay Raut: 'आता राजीनामा नको, गृहमंत्र्यांना हाकला...' संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवर संतापले; CM शिंदेंवर गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com