Raj Thackeray: ना युती, ना आघाडी.. विधानसभेला मनसे स्वबळावर लढणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा

Maharashtra Assembly Election 2024: आगामी निवडणुकीत कोणाशी आघाडी नको, कोणाशी युती नको असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली आहे.
Raj Thackeray: ना युती, ना आघाडी.. विधानसभेला मनसे स्वबळावर लढणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा
Raj Thackeray Latest NewsSaam Tv
Published On

वैदेही कानेकर, मुंबई

Raj Thackeray On Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे. आगामी निवडणुकीत कोणाशी आघाडी नको, कोणाशी युती नको असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. तसेच विधानसभेनंतर मनसे हा सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईच्या गोरेगाव पुर्व येथे मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

काय म्हणाले राज ठाकरे?

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा कार्यकर्ता मेळावा गोरेगाव पुर्व येथे पार पडला. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. आगामी विधानसभेेला ना युती ना आघाडी. आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. मी तुम्हाला सांगतो की निवडणुकांनंतर मनसे सत्तेतला पक्ष असेल, निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू. या महाराष्ट्राची धुरा एकदा माझ्या हातात द्या. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे आवाहनही यावेळी राज ठाकरे यांनी केले.

"निवडणुकीच्या तोंडावर पैशाचा महापूर येईल. वाटेल ते करतील तुम्हाला गोष्टींमध्ये अडकवतील, पैशाचा आव आणतील. पैसे देतील तर घ्या कारण तुमचेच आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. एकदा सत्ता हातात आली की कोणीही कितीही करू दे, महाराष्ट्र कधी झुकणार नाही अदानी येतो विमानतळे, जागा घेतो. माझ्या कोकणात राहणाऱ्यांना मी सांगतो, गुजरातमध्ये शेतीची जमीन विकत शकत नाही पण विकायची असेल तर शेतकऱ्यांना विकू शकतात हा कायदा आहे," असेही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: ना युती, ना आघाडी.. विधानसभेला मनसे स्वबळावर लढणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा
Maharashtra Politics : कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार, कोणता पक्ष किती जागांवर लढणार?

"हातात सत्ता देऊन पाहा एक ही तरुण तरुणी कामाशिवाय रहाणार नाही. प्रत्येक जण आपल्या माणसांचा विचार करतो. तुम्हाला उध्वस्त करायचे आहे सगळ्यांचे डोळे महाराष्ट्राकडे लागले आहे. कोण येतो कशाला येतो, काय थांगपत्ता नाही. महाराष्ट्रात मुंबईत पोलिसांसमोर लोकांसमोर खून होत आहेत. महाराष्ट्रात बलात्कार सुरू आहेत. ह्याला सुसंस्कृत आणि सभ्य महाराष्ट्र म्हणायचं... त्याची दिशा? नाही दशा म्हणतात," असे म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

Raj Thackeray: ना युती, ना आघाडी.. विधानसभेला मनसे स्वबळावर लढणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा
Sambhajinagar Crime : महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चोरांची बेदम मारहाण; हॉस्पिटलमध्ये येण्यास मज्जाव केल्याचा राग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com