Raj Thackeray : रतन टाटांची ती एक गोष्ट राजकारणातही येऊ शकते; राज ठाकरेंनी जनतेला काय केलं आवाहन, वाचा सविस्तर

Raj Thackeray On Ratan Tata : रतन टाटा यांच्यासारखं सभ्य व्यक्तीमत्व राजकारणात तुम्हाला का आवडत नाही, असा सवाल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam Digital
Published On

देशाचा उमदा उद्योगपती, ज्यांच देशाशी उद्योगापलिकडे नातं होतं, त्या रतन टाटांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. मात्र त्यांनी उद्योगपती आणि माणूस कसा असावा हे जगाला शिकवलं. असं सभ्य व्यक्तीमत्त्व जर लोकांना आवडतं तर राजकारणात असे लोक तुम्हाला का आवडत नाहीत?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलं.

रतन टाटांकडे मी बोटेनेकल गार्डन चा आराखडा घेऊन गेलो ते म्हणाले सरकारी सांगितलं तर टक्केवारीत जातं. मी म्हटलं CSR फंडातून करावे लागेल. बजेट वाढत गेलं, पण त्यांनी कधी नाराजी नाही दाखवली.. कारण काम चांगलं होत आहे. ३ कोटी चे प्रोजेक्ट १४ कोटी वर गेले. दुसरं काही असेल तर सांगा आम्हाला तुमच्यासोबत काम कार्याची इच्छा आहे.वरळी पासून दादर चौपाटीपर्यंत सुशोभीकरण करण्याचं ठरलं. पण काही अडथळे कसे आणता येतील यासाठी असतात, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

राज ठाकरे काय म्हणाले?

मी असा महाराष्ट्र कधी नाही पाहिला, अशी विचार धार पहिली नाही. कोण कुठे जातो?. यांचे घरचे यांना कसे साथ देतात. काय संस्कार करत आहोत?. शरद पवार म्हणतात माझा पक्षा फोडला, मात्र काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली, तुम्ही कशा अशा गोष्टी बोलतात. अजित पवार गुलाबी जॅकेट घालून फिरतात. त्यांना भाजपने स्वीकारलं कसं? अजित पवार भाजपसोबत यायच्या आधी मोदी म्हणाले की घोटाळेबाजांना जेलमध्ये टाका, जेलमध्ये म्हणजे पक्षात घेतलं.

लाडकी बहीण योजना कोणाला हवी होती?

लाडकी बहीण योजना आणली आणि पैसे वाटतं सुरू आहे. पण कोणी मागितले होते पैसे?. पुढच्या महिन्यापर्यंत येतील मग नाही येणार. महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. महिलांना सक्षम बनवा त्यांना काम द्या, त्यांना पैसे कमवू द्या, फुकट कसले पैसे देता?. बेरोजगारांना पैसे, शेतकऱ्यांना फुकट वीज. शेतकरी म्हणतो की थोडे पैसे घ्या पण वीज तर द्या.

Raj Thackeray
Baba Siddique Death : 'स्कॉटलंड यार्ड'शी तुलना, आता लाज वाटायला लागलीय! बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर भुजबळ यांची पोलिसांवर आगपाखड

मराठा आरक्षण मिळणार नाही?

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबात मला काही लोक भेटले, पण मराठा समाजाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. सगळ्या राजकीय नेत्यांना माहिती आहे की आरक्षण देणं राज्याच्या हातात नाही. शरद पवारांपासून भाजपपर्यंत सर्वांनाच याची कल्पना आहे. मात्र कोणी सांगत नाही. तामिळनाडूत आरक्षण दिलं पण ते अजून कोर्टात अडकलं आहे.

Raj Thackeray
Noel Tata : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेले नोएल टाटा नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com