Baba Siddique Death : 'स्कॉटलंड यार्ड'शी तुलना, आता लाज वाटायला लागलीय! बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर भुजबळ यांची पोलिसांवर आगपाखड

Chhagan Bhujbal On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्तेनंतर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई पोलिसांवर आगपाखड केली आहे.
Baba Siddique Death
Baba Siddique DeathSaam Digital
Published On

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेवर अजितदादा गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस खात्यावर आगपाखड केली आहे. मुंबई पोलिसांची तुलना आम्ही जागतिक दर्जाच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी करतो पण आता वाईट वाटायला लागलं आहे, अशी टीका करत त्यांनी फक्त Y सिक्युरिटी दिली की पोलिसांचे काम संपलं का? त्यांचं कर्तव्य संपलं का? असा सवाल पोलीस खातं आण गृह मंत्रालयाला केला आहे.

पोलीस अधिकारी कमकुवत आहेत करू शकत नाही अशातलाही भाग नाही पण का करत नाहीत. बातम्या येतात दोन संशयित पकडले जणू काही पोलिसांनीच पकडले. पण त्यांना जमावाने पकडून दिलं. खरोखरच आता रागा येत आहे. अशी परिस्थिती असेल तर हे भयानक आहे.

काल अचानक बातमी आली की बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यांना धमक्या आल्या होत्या त्यामुळे १५ दिवसांपूर्वीच त्यांना Y सिक्युरिटी देण्यात आली होती. पण फक्त Y सिक्युरिटी दिली की पोलिसांचं काम संपलं का? त्यांचं कर्तव्य संपलं? पोलिसांचं काम आहे धमकी आली तर कुठून आली? त्या धमकीचा बंदोबस्त कसा करायचा. मागील ८ दिवसांत आमच्या पक्षातील दोन नेत्यांच्या हत्या झाल्या. कुर्मी यांच्यावर तर घराजवळ हल्ला झाला. मारेकरी पकडले म्हणजे पोलिसांचे काम संपलं का?

दहा पंधरा हजार रुपये देऊन हत्या केल्या जातात, हे तर कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. यामागचा करता करविता वेगळा असून महाराष्ट्र पोलिसांना हे आव्हान आहे चॅलेंज आहे. मुंबई पोलिसांची तुलना आम्ही जागतिक दर्जाच्या स्कॉटलंड यार्ड बरोबर करतो पण आता वाईट वाटायला लागलं आहे.पोलीस अधिकारी कमकुवत आहेत करू शकत नाही अशातलाही भाग नाही पण का करत नाहीत, हा सवाल आहे.

Baba Siddique Death
Sanjay Raut: 'आता राजीनामा नको, गृहमंत्र्यांना हाकला...' संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवर संतापले; CM शिंदेंवर गंभीर आरोप

मी होम मिनिस्टर असताना अशी परिस्थिती निर्माण झाली होती मोठ्या प्रमाणात गॅंगवार सुरू होतं. बॉलीवूड मुंबई सोडून हैदराबादला चालल होतं. मात्र त्या वेळचे पोलीस ऑफिसर आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते पूर्णपणे कंट्रोल केलं होतं.पोलिसांना पूर्णपणे फ्री हँड द्यावा लागेल. Y द्या नाहीतर Z द्या, नाहीतर Z प्लस द्या ही पोर येतात परराज्यातून. दहा हजार पंधरा हजार रुपये देतात, पिस्तूल देतात आणि सांगतात याला मारायचं आहे. या पाठीमागे कोण आहेत ही गुंडगिरी नष्ट करण्याचं काम पोलिसांसमोर आहे.

सुरक्षा मागितली की दे सुरक्षा आणि काम संपलं आमचं कर्तव्य संपलं असं होत नाही. मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे की आपलं नाव खराब होत आहे ते सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे.कुठल्याही दबावाला बळी न पडता कठोर हाताने या सर्वांचा बंदोबस्त झाला पाहिजे, असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे.

Baba Siddique Death
Sanjay Raut: 'आता राजीनामा नको, गृहमंत्र्यांना हाकला...' संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवर संतापले; CM शिंदेंवर गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com