Dark clouds over Pune as IMD issues heavy rain alerts for Ratnagiri (Red) and several districts (Orange/Yellow) across Maharashtra. Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, रत्नागिरीत रेड अलर्ट, पुण्याला ऑरेंज अलर्ट

What is the climate in Maharashtra today? : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरीसाठी रेड अलर्ट, पुणेसह घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी. इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट; विजांसह वादळी पावसाची शक्यता.

Namdeo Kumbhar

Maharashtra Weather Today : राज्यात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार, राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि मराठवाडा परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या हवामान प्रणालींमुळे राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस घाट विभागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यात पावसाची शक्यता:

पुणे परिसरात आज कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोमवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असून, हलक्या पावसाची अपेक्षा आहे.

राज्यात आज कुठे कुठे अलर्ट?

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : रत्नागिरी.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मुंबई, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर.

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paan Sharbat Recipe : बाहेरून थकून आल्यावर प्या गारेगार 'पान सरबत', मिनिटांत व्हाल रिफ्रेश

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Kajol : "नमस्कार सगळ्यांना..."; पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलनं 'मराठी' भाषेत व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी, २७ लाख 'लाडकी'ची आजपासून पडताळणी,अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार!

अकोल्यात धक्कादायक घटना, पत्नी-सासरच्यांच्या छळामुळे तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, व्हिडीओतून गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT