Ahmedabad Air India Plane crash Death Toll : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील १३ जणांचा समावेश आहे. ४ क्रू मेंबर्स, पायलट आणि ८ प्रवशांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त विमानाने गुरुवारी दुपारी १.३८ मिनिटांनी लंडनसाठी अहमदाबादमधून उड्डाण घेतलं, पण हाकेच्या अंतरावर गेल्यानंतर ७०० फुटावरून डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला. ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं, त्या ठिकाणी २४ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शिकावू डॉक्टरांचाही समावेश आहे. अहदमबाद येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १३ जणांचा समावेश आहे. त्याची यादी समोर आली आहे. (Full list of 13 Maharashtra victims in Ahmedabad plane crash)
अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच मेघानी नगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील १३ जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये मैथिली पाटील, अपर्णा महाडिक, रोशनी सोनघरे, दीपक पाठक आणि इतर क्रू मेंबर्सचा समावेश आहे. मृतांमध्ये विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल आणि काही क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. कॅप्टन सुमीत सभरवाल हे मुंबईतील पवई येथील जल वायु विहार येथे राहत होते.
अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील मृत व्यक्तींची सर्व यादी - Full list of 13 Maharashtra victims in Ahmedabad plane crash
सुमीत सभरवाल, (पायलट) पवई
दीपक पाठक, (क्रू मेंबर) बदलापूर
मैथिली पाटील (क्रू मेंबर) , पनवेल
रोशनी सनघरे (क्रू मेंबर), डोंबिवली
अपर्णा महाडिक (क्रू मेंबर), गोरेगाव
साईनीता, जुहू
अशा पवार, सांगोला
महादेव पवार, सांगोला
यशा कामदार-मोढा, नागपूर
रूद्र कामदार , नागपूर
रक्षा कामदार , नागपूर
समीर शेख, पिंपरी
श्रद्धा धवन, मुलूंड
अपघातग्रस्त विमानातील अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहे. अपर्णा महाडिक यांचा पती हा सुनील तटकरे यांचा भाचा आहे. अपर्णा महाडिक यांचे पतीही विमानात पायलट म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशनी सोनघरे, इरफान शेख हे सर्व क्रू मेंबर्स होते. मैथिली पाटील ही पनवेलमधील आहे, ती एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. रोशनी सोनघरे ही क्रू मेंबर्स होती. बदलापूरचे दीपक पाठक हेही क्रू मेंबर म्हणून कार्यरत होते.
गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू झाला. इरफान हा पिंपरी चिंचवड च्या संत तुकाराम नगर मध्ये राहायला होता. आजी आजोबा आई वडील भाऊ असं कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडिया मध्ये कामाला लागला होता. अत्यंत मनमिळाऊ असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.