Ahmedabad Plane Crash : पिंपरी चिंचवडच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू, 'बकरी ईद' कुटुंबियांसोबतचा ठरला अखेरचा सण

Irfan Shaikh Death Ahmedabad Plane Crash: पिंपरी चिंचवडच्या २२ वर्षीय इरफान शेख याचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. इरफान बकरी ईदच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबीयांच्या भेटीला आला होता
Irfan Shaikh Death Ahmedabad Plane Crash
Irfan Shaikh Death Ahmedabad Plane CrashSaam TV News Marathi
Published On

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Ahmedabad Air India Plane Crash News Today Death Toll : अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत महाराष्ट्रामधील १२ ते १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, रायगड, कल्याण, डोंबिवली, नागपूरसह पिंपरी चिंचवडमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. एअर इंडियाच्या विमानात कॅबिन क्रू असलेल्या २२ वर्षीय इरफान शेख (Pimpri Chinchwad Irfan Shaikh Death) याचा अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यू झाला. इरफान हा पिंपरी चिंचवड शहरातील आहे. नुकत्याच झालेल्या बकरी ईदच्या सणाला इरफान पिंपरी चिंचवडमध्ये आला होता. हा कुटुंबियांसोबतचा त्याचा अखेरचा सण ठरला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये केबिन क्रूमध्ये कार्यरत असणाऱ्या इरफानचाही मृत्यू झाला. इरफानसारख्या तरुणाचा अपघाती मृत्यू काळजाला भिडणारा आहे.

इरफान शेख हा आपल्या कुटुंबासोबत पिंपरी चिंचवड (Irfan Shaikh from Pimpri dies in Air India plane crash) शहरातील संत तुकाराम नगर परिसरात वास्तव्यास होता. इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये केबिन क्रूमध्ये गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होता. पण गुरूवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. इरफान हा बकरी ईदच्या सणाला पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कुटुंबीयांच्या भेटीला आला होता. हा सण कुटुंबियांसोबतचा त्याचा अखेरचा सण ठरला.

Irfan Shaikh Death Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash : अकोल्याची ऐश्वर्या विमान अपघातामधून थोडक्यात वाचली, त्या इमारातीमधून कशी केली सुटका? थरारक अनुभव

इरफानला एअरलाइन् मध्ये करिअर करायचं होतं. गेल्या काही दिवसांपासून तो एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून काम करत होता. उज्जव भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या २२ वर्षीय इरफान याच्यावर काळाने घाला घातला. इरफानच्या जाण्याने कुटुंबांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. काळाने इरफान शेख याला हिरावून घेतल्यामुळे कुटुंबिय दु:खात बुडाले आहेत.

Irfan Shaikh Death Ahmedabad Plane Crash
Air India : मोठी बातमी! लंडनला निघालेले एअर इंडियाचं विमान मुंबईत माघारी बोलवलं, कारण आलं समोर

इरफानचं पार्थिव आणण्यासाठी आई आणि भाऊ अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. डीएनए तपासणी झाल्यानंतरच इरफानचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे. तब्बल ७०० फूट उंचीवरून विमान कोसळल्यामुळे मोठा स्फोट झाला अन् सर्वांची क्षणात राखरांगोळी झाली. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त मृतदेह ताब्यात घेण्यात आलेले आहेत. मृतदेह पूर्णपणे जळलेले असल्यामुळे ओळख पटत नाही. त्यामुळे डीएनए चाचणी करण्यात येत आहे. या विमान दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Irfan Shaikh Death Ahmedabad Plane Crash
गणपती बाप्पामुळे वाचले.. ट्रॅफिकमध्ये फसली अन् अपघातग्रस्त विमान सुटलं, मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com