Air India : मोठी बातमी! लंडनला निघालेले एअर इंडियाचं विमान मुंबईत माघारी बोलवलं, कारण आलं समोर

Mumbai-London Flight Recalled Midway : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी एअर इंडियाच्या मुंबईहून लंडनला जाणाऱ्या AI129 फ्लाइटला अर्ध्यातून माघारी बोलावण्यात आलं. इराण-इस्रायल संघर्षामुळे आणि हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.
Air India emergency return News Update
Air India flight AI129, en route to London, returned safely to Mumbai due to rising geopolitical tensions between Iran and Israel – Airline cites safety concerns.Saam TV News
Published On

Air India emergency return News Update : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं अन् २६५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी एअर इंडियाने मुंबईहून लंडनला जाणाऱ्या आणखी एका विमानाला अर्ध्यातून माघारी बोलावले. एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अर्ध्या तासाच विमानाला परत बोलवण्यात आले. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

लंडनला जाणारे विमान पुन्हा माघारी बोलण्यात आल्यानंतर एअर इंडियाकडून सोशल मीडियावर स्पष्टीकरण देण्यात आले. एअर इंडियाने सांगितले की, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला पुन्हा माघारी बोलवण्यात आले आहे. दरम्यान, एअर इंडियाने जाहीर केलेल्या यादीत मुंबई-लंडन फ्लाइट एआय १२९ चा समावेश आहे. हे विमान सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरले आहे.

Air India emergency return News Update
गणपती बाप्पामुळे वाचले.. ट्रॅफिकमध्ये फसली अन् अपघातग्रस्त विमान सुटलं, मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव
इराणमधील उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आणि त्यानंतर त्या देशाच्या हवाई हद्दीच्या बंदमुळे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही विमाने वळवण्यात आली, तर काहींना माघारी बोलावण्यात आले. या व्यत्ययामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी निवास व्यवस्थेसह सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तिकिट रद्द करणाऱ्यांना परतावा किंवा विनामूल्य पुनर्नियोजनाचा पर्याय उपलब्ध आहे.
एअर इंडिया
Air India emergency return News Update
Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेत अभिनेत्यानं जवळच्या व्यक्तीला गमावलं, अहमदाबाद प्लेन क्रॅशवर व्यक्त केलं दु:ख

एअर इंडियाने खालील विमानांचे मार्ग बदलले अथवा माघारी बोलवलं, संपूर्ण यादी

AI130 – लंडन हीथ्रो-मुंबई – व्हिएन्नाला वळवले

AI102 – न्यूयॉर्क-दिल्ली – शारजाहला वळवले

AI116 – न्यूयॉर्क-मुंबई – जेद्दाला वळवले

AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबईला वळवले

AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईला परत

AI119 – मुंबई-न्यूयॉर्क – मुंबईला परत

AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीला परत

AI106 – न्यूअर्क-दिल्ली – व्हिएन्नाला वळवले

AI188 – व्हँकुव्हर-दिल्ली – जेद्दाला वळवले

AI101 – दिल्ली-न्यूयॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानला वळवले

AI126 – शिकागो-दिल्ली – जेद्दाला वळवले

AI132 – लंडन हीथ्रो-बेंगळुरू – शारजाहला वळवले

AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली – व्हिएन्नाला वळवले

AI104 – वॉशिंग्टन-दिल्ली – व्हिएन्नाला वळवले

AI190 – टोरंटो-दिल्ली – फ्रँकफर्टला वळवले

AI189 – दिल्ली-टोरंटो – दिल्लीला परत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com