Manoj Jarange Patil And MLA Prasad Lad  saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, प्रसाद लाड यांचं मोठं विधान; मनोज जरांगेंना दिला शब्द

Manoj Jarange Patil And MLA Prasad Lad: प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. 'जर मागण्या मान्य न झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल.', असा शब्द प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना दिला.

Priya More
  • मराठा आरक्षणावर प्रसाद लाड यांचे मोठे विधान

  • मागण्या मान्य न झाल्यास आमदारकीचा राजीनामा

  • अंतरवाली सराटीत प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंमध्ये २ तास बैठक झाली

  • प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना शब्द दिला

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी सरकारला २८ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. २८ तारखेपर्यंत मागण्या मंजूर झाल्या नाही तर उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना शब्द दिला. मराठा आरक्षणाबाबत महत्वाचे विधान करताना प्रसाद लाड म्हणाले, 'जर मागण्या मान्य न झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल.'

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला २८ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. मनोज जरांगे यांच्या मागण्या घेऊन प्रसाद लाड मुंबईला येऊन उपसमितीशी चर्चा करणार आहेत तर मुख्यमंत्र्यांनाही या विषयीची माहिती देणार असल्याचं प्रसाद लाड यांनी यावेळी माध्यमांसमोर सांगितलं. मात्र २८ तारखेपर्यंत मागण्या मंजूर झाल्या नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाशी संबंधित असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे ३० मेपासून आंदोलनाला सुरूवात करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली. प्रसाद लाड यांच्या शब्दामुळं गावांगातील मराठा समाजाच्या बैठका थांबवण्या आल्या. कमी दिवस राहिल्याने आंदोलनाची तेवढी तयारी होणार नाही, पण उपोषण होणार असे जरांगे पाटील यांनी सांगितले. २८ तारखेला सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत ते आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.

प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितले की, 'मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मनोज जरांगे यांच्यामुळे मिळालं आहे. त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. काही गैरसमजातून सध्या विषय निर्माण झाले आहेत. मी मनोज जरांगे यांना विनंती केली की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून घेतले पाहिजे. ३० मे ही आंदोलनाची तारीख योग्य नाही. सध्या कडक ऊन आहे आणि शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आहेत. त्यामुळे जरांगेदादांनी आंदोलन मागे घ्यावे आणि मला एक संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी मी लहान भाऊ म्हणून येथे आलो आहे.'

तसंच, 'मनोज जरांगे पाटील यांनी मला भाऊ म्हटलं आहे. मला अभिमान वाटला. तुमच्या नेतृत्वामुळे देशभरातील समाजाला न्याय मिळाला. मी समाजाचा कार्यकर्ता आहे. मी जातीसाठी माती खायला तयार आहे. जरांगेदादांच्या ७ ते ८ प्रमुख मागण्या आहेत. त्या मी सविस्तर समजून घेणार आहे. आरक्षणाचा हत्ती गेला असून आता फक्त शेपूट राहिले आहे. या मागण्या घेऊन मी मंत्रिमंडळ उपसमिती आणि सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करेन. मी अनेक महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन आलो आहे. यापुढे मनोज जरांगे यांना आंदोलन करावे लागणार नाही याच भावनेतून मी काम करेन. मला समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत.' असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT