Maratha Reservation: राज्यात किती कुणबी नोंदी मिळाल्या? अधिकृत आकडा आला समोर, त्या प्रत्येकाला मिळणार मराठा आरक्षण

Major Update on Maratha Quota: मराठा आरक्षणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यामध्ये ४८ लाख कुणबी नोंदी आढळल्या असल्याची बातमी समोर आली आहे. यामधील १२ लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
Maratha Reservation: राज्यात किती कुणबी नोंदी मिळाल्या? अधिकृत आकडा आला समोर, त्या प्रत्येकाला मिळणार मराठा आरक्षण
Maratha Reservation Saam TV
Published On

Summary -

  • राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर

  • राज्यातील तब्बल ४८ लाख कुणबी नोंदी सापडल्या

  • या नोंदींवर आधारित १२ लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले

  • मागील ६ महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विभागात ४९,९५८ प्रमाणपत्रे देण्यात आली

गणेश कवडे, मुंबई

मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे. संदीप शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यामध्ये ४८ लाख कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. या नोंदींच्या आधारे एकूण १२ लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. मागील ६ महिन्यात छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण ४९,९५८ कुणबी प्रमाणपत्रे तर फक्त बीड जिल्ह्यात ३४,६९२ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील ८ पैकी ७ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या एकूण १६१ गुन्ह्यांपैकी केवळ ७१ गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध याचिकांचा आढावा घेत स्पेशल काऊन्सिलची नियुक्ती केली जाणार आहे. सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत पुणे विभागीय आयुक्त यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Maratha Reservation: राज्यात किती कुणबी नोंदी मिळाल्या? अधिकृत आकडा आला समोर, त्या प्रत्येकाला मिळणार मराठा आरक्षण
Maratha Reservation: तुम्ही काढलेला आरक्षणाचा जीआर फसवा..., मराठा कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना घेराव घालत विचारला जाब; पाहा VIDEO

सोबतच, मराठा आरक्षणात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यांनी वारसांना नियुक्ती देण्याबाबत संचालक मंडळामध्ये ठराव घ्यावा असे निर्देश मराठा उपसमितीने दिले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Maratha Reservation: राज्यात किती कुणबी नोंदी मिळाल्या? अधिकृत आकडा आला समोर, त्या प्रत्येकाला मिळणार मराठा आरक्षण
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटबाबत धक्कादायक माहिती आली समोर; संभाजीनगरात एकालाही नाही मिळालं कुणबी प्रमाणपत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com